iphone 15 खरेदी करतानाiphone 15 खरेदी करताना

iPhone 15 लाँच झाल्यापासून अनेक आयफोन वापरणाऱ्यांना तो घेण्याची इच्छा झाली. प्रत्येक वर्षी फोन आल्यानंतर आयफोनच्या दुकानात फोन घेण्यासाठी रांग लागते. हा फोन वापरणाऱ्यांना त्यांच्यामध्ये असलेले फिचर्स इतके आवडतात की, हा फोन घेऊ नये यासाठी त्यांच्याकडे कोणतेच कारण नसते. पण गेल्या काही वर्षांपासून तसे काही होताना दिसत नाही. आयफोनमध्ये काही ना काही तक्रारी या कायम असल्याचे दिसून आले आहे. कधी फोनच्या प्रोसेसरमध्ये अडचणी तर कधी प्रोडक्शनमध्ये कमतरता असे दिसून आले आहे. आता नव्या आलेल्या आयफोनमध्येही काही तक्रारी असल्याचे समोर आले आहे. iPhone 15 मध्ये काही त्रुटी असल्यामुळे त्याचा खप फारसा होत नसल्याचे दिसून आले आहे. जर तुम्ही नवा आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही महत्वाची बातमी नक्कीच वाचा.

Mobile Charging | मोबाईल चार्ज करताना या चुका टाळा, नाहीतर फोन होईल खराब

iPhone 15 मध्ये आहेत या त्रुटी

iPhone 15 खरेदी करण्यापूर्वी त्यामध्ये असलेल्या त्रुटी तुम्ही जाणून घ्यायला हव्यात म्हणजे तुमची फसवणूक झाली असे तुम्हाला वाटणार नाही.

  1. डिझाईनचा विचार कराल तर नव्या आयफोनमध्ये आणि iPhone 14 मध्ये डिझाईनचा असा काही फरक पडलेला दिसत नाही. त्यातील फिचर थोडे बदलण्यात आले आहेत इतकाच काय तो फरक त्यामध्ये पडलेला दिसत आहे. त्यामुळे त्याच वेगळेपणा असा काही तुम्हाला मिळणार नाही. हा रंगात तितका वेगळेपणा काय तो अनुभवता येईल.
  2. फोन ज्यांनी प्री बुक केले त्यांच्याकडून काही त्रुटी या समोर आल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे फोन गरम होणे. आयफोन हा कधीच गरम होत नाही आणि तो झाला तरी त्यामध्ये कुलींग फॅक्टर असते जे असे काम करते की तुम्ही कितीही फोन वापरला तरी तो ओव्हर हिट होत नाही. पण या नव्या फोनमध्ये तसे दिसत नाही. हा फोन अगदी काही मिनिटांसाठी जरी वापरला तरी तो खूप जास्त तापतो अशा तक्रारी ग्राहकांनी केल्या आहेत. ज्यामुळे अनेकांचे फोन परत घेण्यात आले.
  3. शिवाय या फोनच्या मागे जी काच आहे ती अगदीच तकलादू आहे. त्यामुळे फोन जरा जरी आपटला तरी देखील त्याची काट फुटू शकते अशी भिती आहे. त्यामुळे तो रफ ॲण्ड टफ असा वापरणे थोडे कठीणच आहे.
  4. याचे स्टेनलेस स्टीलचे जे पॅनल बनवण्यात आले आहे ते देखील अनेकांना तकलादू वाटते.

या काही त्रुटींमुळे अनेकांनी हा नवा आयफोन घेणे टाळले आहे. तुम्हीही iPhone 15 घेताना हा विचार नक्की करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *