Coconut Oil नारळाच्या तेलाचे अनेक फायदे आहेत.हे आपण सगळेच जाणतो. नारळाचा उपयोग अनेक स्किनकेअर प्रॉडक्टमध्ये देखील केला जातो. थंडीच्या या दिवसात अनेक जण नारळाच्या तेलाचा उपयोग नॅचरल मॉश्चरायझर म्हणून करतात. ओठांसाठीही त्याचा वापर करता येऊ शकतो. नारळाच्या तेलाचा उपयोग नेमका ओठांसाठी कसा करावा हे आपण जाणून घेणार आहोत. यासोबतच तुम्ही केसांसाठी मेथी दाण्याचे फायदे हा लेख वाचायला अजिबात विसरु नका. चला करुया या माहितीला सुरुवात
नारळाच्या तेलाचे फायदे Coconut Oil
त्वचेसाठी नारळाच्या तेलाचे खूपच फायदे आहेत. नारळाच्या तेलाने नेमके तुम्हाला कोणते फायदे मिळतात ते आता जाणून घेऊया.
- नारळाचे तेल हे नॅचरल मॉश्चरायझर आहे. त्याच्या वापरामुळे त्वचा हायड्रेट दिसते.
- नारळाचे तेल हे अँटीबॅक्टेरिअल आहे. त्यामुळे त्वचेशी असलेल्या कोणत्याही समस्या त्यामुळे होत नाही.
- इतर कोणत्याही कॉस्मेटिक्समध्ये तुम्हाला त्रास होऊ शकतो. परंतु नारळाच्या तेलाचा कसाही वापर केला तर त्याने तुम्हाला कोणत्याही समस्या या उद्भवत नाहीत.
नारळाच्या तेलाचा असा करा ओठांसाठी वापर
नारळाच्या तेलाचा ओठांसाठी कसा वापर करायचा असा विचार करत असाल तर नक्की फॉलो करा या टिप्स
- नारळाचे तेल एका कंटेनरमध्ये काढून ते फ्रिज करुन घ्या. त्यानंतर त्यातील थोडेसे तेल हातावर घेऊन ते ओठांना लावा. ओठांवर त्याचा चांगला मसाज करा. त्यामुळे ओठ चांगले मॉश्चराईज होतील.
- शिआ बटरमध्ये नारळाचे तेल घेऊन त्याचा एक लिप बाम सेट करा आणि तो वापरा त्यामुळेही तुमचे ओठ मुलायम राहतील.
- नारळाच्या तेलात साखर घालून तुम्ही अगदी नाजूक हाताने स्क्रब करा. त्यामुळे ओठांना त्रास होणार नाही आणि तुमचे ओठ चांगले राहतील.
अशाप्रकारे तुम्ही Coconut Oil चा वापर ओठांसाठी करु शकता.