Benefits Of Fenugreek Seeds तर तसे अनेक आहेत. पण केसांसाठी मेथींचा उपयोग हा अगदी हमखास केला जातो. खरतरं केस आणि त्वचेसाठी किचनमधील अनेक घटक उपयोगाचे असतात. आयुर्वेदात त्यांना अनन्यसाधारण असे महत्व आहे. पण त्याचा योग्य वापर माहीत हवा. जर तसे झाले तर तुम्हाला त्याचा फायदा मिळण्यास नक्कीच मदत मिळते. आज आपण केसांसाठी मेथीच्या दाण्याच्या नेमका कसा उपयोग करायचा हे जाणून घेऊया.
How To Select Perfume | 10 परफ्युम निवडताना घ्या ही काळजी
केसांसाठी मेथी दाणे आहेत वरदान | Benefits Of Fenugreek Seeds
मेथीचे दाणे विविध पद्धतीने केसांसाठी वापरता येतात ते आपण पुढे जाणून घेणार आहोत सध्या आपण केसांसाठी मेथीचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.
- मेथी दाण्यामध्ये प्रोटीन आणि निकोटीनिक ॲसिड असते जे केसांच्या वाढीसाठी फारच उत्तम मानले जाते. त्याच्या वापरामुळे केसगळती थांबून केस जाड होण्यास मदत मिळते.
- जर तुम्हाला सतत केस गळती होत असेल तर अशावेळी मेथीचे दाणे केसगळती रोखण्यास मदत करते.
- मेथीचेे दाणे हे केसांसाठी कंडिशनरचे काम करते. मेथ्या रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी त्या वाटल्या तर एक चिकट पदार्थ त्यातून येतो. तेच केसाला कंडिशन करायचे काम करते. ज्यामुळे केस चमकदार दिसतात.
- अनेकदा हार्मोन्सच्या कारणामुळे केसगळती होत असते. मेथीचे दाणे हे केसांच्या मुळाला अधिक मजबूत करते आणि केसांच्या वाढीला प्रेरणा देते.
- अनेकदा शरीरात तेलग्रंथीतून अधिक तेलाचा स्त्राव होऊ लागला तरी देखील केसांची गळती होऊ लागते. तेलग्रंथीतून तेलाचा स्त्राव नियंत्रित करण्यासाठी मेथी दाणे फायद्याचे ठरतात.
असा करा मेथीच्या दाण्याचा वापर
केसांसाठी मेथीचा वापर हा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. काही जण मेथीच्या पाण्याचे सेवन देखील करतात त्यामुळेही तुम्हाला फायदा मिळू शकतो.
- मेथीचे दाणे रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी त्याची पेस्ट करावी. त्यात दही घालून तो मास्क केसांना लावून ठेवावा. साधारण 30 मिनिटे हा मास्क लावून ठेवावा. त्यामुळे केस चांगले होण्यास मदत मिळेल.
- तुमच्या कोणत्याही आवडीच्या तेलात मेथीचे दाणे घालून ते तेल उकळवा. ते तेल तुम्ही आठवड्यातून एकदा वापरा
जर तुम्हाला मेथ्यांचा उपयोग करायचा असेल तर तुम्ही त्या आधी तुम्हाला त्यापासून काही त्रास होत आहे की नाही ते तपासा मगच त्याचा उपयोग करा.