Benefits Nabhi Oil आयुर्वेदामध्ये नाभीत तेल टाकण्याचे अनेक फायदे सांगितले जातात. नाभीत तेल टाकणे ही खूप जुनी पद्धत असून ती आता पुन्हा एका नव्याने लोकांसमोर आली आहे. असे म्हणतात की, नाभीत असलेले मणिपूर चक्र तुमचे संपूर्ण आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करत असते. पोटाचे स्वास्थ्य बिघडले की, संपूर्ण शरीराचे स्वास्थ्य बिघडते. त्यामुळे नाभी हा शरीराचा असा भाग आहे ज्याने आपले आरोग्य चांगले राहण्यास आपल्याला मदत मिळते. आज आपण नाभीत तेल घालण्याचे विविध फायदे जाणून घेणार आहोत.
Benefits Nabhi Oil नाभीत तेल घातल्यामुळे होतात हे फायदे
आयुर्वेदात नाभीत तेल घालण्याचे अनेक फायदे सांगितले जातात. पण नाभीत तेल घालताना जर तुम्हाला काही त्रास असतील तर तुम्ही आधीच त्याविषयी सल्ला घेतला पाहिजे आणि मगच नाभीत तेल घालण्यास सुरुवात करा.नाभीमध्ये तिळाचे किंवा नारळाचे तेल घातले जाते. जर त्याहून अधिक चांगले काही घालायचे असेल तर त्यामध्ये तुम्हाला साजूक तूप देखील घालता येते.
Heart Attack | तरुणांमध्ये वाढतेय हार्ट अटॅकची भीती, काय आहेत कारणं
- त्वचा सुंदर राहण्यासाठी नाभीत तेल घातले जाते. असे म्हणतात की, नाभीच्या द्वारे जर तुम्ही काही थेंब तेल टाकले तर त्यामुळे त्वचा मॉश्चराईज आणि सुंदर होण्यास मदत मिळते. वर वर तेल लावण्यापेक्षा आतून त्याचा फायदा आपणास मिळतो.
- खूप थकवा आला असेल तर नाभीत तेल घातल्याने थकवा जाण्यास मदत मिळते. तुमच्या Nervous System साठी हा एक चांगला असा उपाय आहे.
- ज्यांना अनिद्राचा त्रास असेल तर तुम्ही रात्री झोपताना नाभीत तेल टाकायला हवे. त्यामुळे चांगली झोप मिळण्यास मदत मिळते.
- नाभीच्या मागे मणिपूर चक्र असते. ते तुमच्या पचनशक्तीला चालना देत असते. जर तुम्हाला पोटाचे काही विकार असतील तर ते सुरळीत करण्यासाठी मदत करतात.
- महिलांच्या प्रजनन कार्याला चालना देण्यासाठीही नाभीतील तेल फायद्याचे असते. जर तुम्ही नाभीत तेल घातले तर त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकेल.
- मासिक पाळीत जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर त्यामध्येही आराम मिळण्यासाठी नाभीतील तेल फायद्याचे ठरते.
नाभीत तेल घालण्याचे हे फायदे जाणून घेतल्यानंतर योग्य सल्ला घेऊन तुम्ही त्याचा