तरुणांमध्ये वाढतेय heart attack ची समस्यातरुणांमध्ये वाढतेय heart attack ची समस्या

Heart Attack हा आता काही नवा राहिला नाही. या आजाराने आतापर्यंत अनेक तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अगदी फिट वाटणारे तरुण देखील या आजाराला घाबरुन असतात. या पूर्वी केवळ वयस्क लोकांनाच अटॅक येत होते. पण आता तसे राहिले नाही. अंगामासाने फिट असणारे, जीम करणारे तरुणही अटॅक आल्याने मृत पावल्याचे निदर्शनास आले आहे. अटॅक का एकाएकी येत नाही. त्यासाठी तुम्ही आरोग्याची काळजी कशी घेता हे देखील जाणून घेणे तेवढेच महत्वाचे आहे. हल्लीचे बदललेले लाईफस्टाईल पाहता या सगळ्याला कारणीभूत हेच असल्याचे दिसून येते. पण आता लाईफस्टाईल बदलण्यासाठी आजुबाजूची परिस्थिती बदलू शकत नाही. पण आपण आपल्यात काही बदल नक्कीच आणू शकतो जे आपल्याला निरोगी राहण्यास मदत करु शकेल.

या लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष Heart Attack

पूर्वी सारखे आता डॉक्टर नाहीत असे अजिबात नाही. आज आपल्याकडे लोकसंख्येला पुरेशी पडतील असे डॉक्टर आहेत. काही खास गोष्टींसाठी आपण हमखास डॉक्टरांकडे जातो. पण ज्या आपल्या खरोखर आरोग्याशी निगडीत असतात अशा वेळी मात्र आपण डॉक्टरांकडे जाणे टाळतो. जर तुम्हाला काही लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही त्याकडे अगदी आवर्जून लक्ष द्यायला हवे. जसे की आपला डावा हात दुखणे, छाती पिळवटल्यासारखी वाटणे, सतत थकवा जाणवणे, श्वास घेताना अडथळे निर्माण होणे, जबडा आणि पाठ दुखणे हे काही संकेत Heart Attack चे असू शकतात. जर तुम्हाला या गोष्टी काहीही न करता जर होत असतील तर तुम्ही तुमच्या शरीराचे ऐकायला हवे. योग्य वेळी डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो सल्ला घ्यायला हवा.

Uric Acid Symptoms | युरिक ॲसिड वाढल्याची लक्षणे आणि उपाय

Heart Attack ला असे ठेवा दूर

Heart Attack साठी काही कारणं असली तर त्यापासून दूर राहून आपले ह्रदय चांगले ठेवायचे असेल तर काही बदल हे आपण करणे फार गरजेचे आहे. त्यासाठी काय करायला हवे ते जाणून घेऊया.

  1. नियमित आणि योग्य व्यायाम हा गरजेचा आहे. आता खूप जण शरीर कमावण्यासाठी शरीर थकेपर्यंत व्यायाम करतात. असे अजिबात करुन नका. शरीराला जितका व्यायाम हवा तितकाच करा.
  2. खाण्यापिण्याच्या सवयी या देखील बदलणे गरजेचे आहे. हल्ली जंकफुड हे आपल्या खाद्यसंस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे या गोष्टी पूर्णपणे बंद होऊ शकत नाही. पण त्यांचे प्रमाण कमी करता येऊ शकते.
  3. कामाचा ताण हा देखील अनेकदा Heart Attack ला कारणीभूत ठरु शकतो.त्यामुळे तो ताण कमी करण्यासाठी तुम्ही योगसाधना, प्राणधारणा करा त्यामुळे तुम्हाला नक्कीच फरक पडेल. मन: शांत करण्यास आणि शांत झोप लागण्यास मदत मिळेल.
  4. डॉक्टरांकडे काही त्रास असेल तरच जाणे टाळा. वर्षातून किमान दोनवेळा आपल्या विविध चाचण्या करुन घ्या. त्यामुळे तुमचे आरोग्य कसे आहे ते कळण्यास तुम्हाला मदत मिळते. शिवाय योग्यवेळी औषधोपचार घेता येतात.

Heart Attack ला दूर ठेवायचे असेल तर तुमच्या काही सवयी तुम्ही नक्कीच बदला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *