युरिक ॲसिड वाढल्याची लक्षणेयुरिक ॲसिड वाढल्याची लक्षणे

Uric Acid Symptoms युरीक ॲसिड हे शरीरातील नको असलेले घटक काढण्याचे काम करते. त्यामुळे शरीर शुद्ध होण्यास मदत मिळते. पण शरीरातील युरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्यानंतर मात्र काही त्रास हे आपल्याला जाणवू लागतात. जर त्याकडे दुर्लक्ष झाले तर त्याचे पर्यवसान हे तुम्हाला ‘हायपरयुरेसेमिया’ कडे घेऊन जाते. ज्यामुळे कालांतराने तुम्हाला किडनी स्टोनसारखे त्रास होऊ लागतात. शरीर आपल्याला नेहमीच काही ना काही संकेत देत असते. अशावेळी त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. जर तुम्हाला काही लक्षण जाणवत असतील तर ती युरिक ॲसिड वाढल्याची तर नाहीत ना ते एकदा जाणून घ्यावे.

युरिक ॲसिड वाढल्याची लक्षणे Uric Acid Symptoms

जर तुमच्या शरीरात युरिक ॲसिड वाढले असेल तर तुमचे शरीर तुम्हाला काही ना काही संकेत नक्कीच देऊ लागते. ती लक्षणे कोणती हे आपण आता जाणून घेऊया

  1. जर तुमच्या शरीरात युरिक ॲसिड वाढले असेल तर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास अचानक सुरु होतो. तुमचे अचानक गुडघेदुखी होऊ लागते. पण याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. कारण याचा अर्थ तुमचे युरिक ॲसिड वाढलेले असू शकते.
  2. अचानक अंग दुखू लागले, सुजू लागणे असे काही त्रास तुम्हाला होत असेल तर ते देखील याचेच लक्षण असू शकते.
  3. युरिक ॲसिडचे प्रमाण वाढले की, होणारा मन:स्ताप म्हणजे किडनीस्टोन.हा त्रास महिला आणि पुरुष दोघांना होता. जर तुम्हाला लघवी करताना खूप जळजळ जाणवत असेल तर वेळीच त्याकडे लक्ष द्या.
  4. सतत आजारी पडणे हे निरोगी आरोग्याचे लक्षण मुळीच नाही. परंतु जर तुम्हाला असा थकवा आणि आजारी असल्यासारखे सतत वाटत असेल तर तुमचे युरिक ॲसिड वाढले आहे असे समजावे.

युरिक ॲसिड उपाय

युरिक ॲसिड वाढले हे जर तुम्हाला लक्षणांवरुन कळत नसेल तर तुम्ही रक्त चाचणी करुनही तुम्हाला हा त्रास आहे की,नाही ते तपासू शकता. त्यानंतर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला काही बदल करणे हे अपेक्षित आहे.

  1. तुम्ही पाणी पिणे कमी केले असेल तर योग्य प्रमाणात पाणी पिणे सुरु करा.
  2. सगळ्या गोष्टी या तुमच्या आहारापासून सुरु होतात, जर तुमचा आहार पुरक नसेल तर तो कसा होईल याचा अधिक विचार करा. पुरक आणि चांगला आहार तुमच्या शरीरातील युरिक ॲसिड कमी करण्यास मदत करतो. उदा. मैदा, अतिरिक्त प्रोटीन असलेले पदार्थ जसे की, मासे, मटण, चिकन असे खाणे कमी करा. या पदार्थांमुळे तुमच्या शरीरात युरिक ॲसिड वाढू शकते.
  3. जर तुम्ही व्हिटॅमिन सीचे योग्य प्रमाणात सेवन केले तरी देखील आपल्याला असलेले युरिक ॲसिडचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळेल.
  4. वजनवाढीचाही परिणाम युरिक ॲसिडवर होत असतो. जर तुमचे वजन काही कारणास्तव वाढले असेल तर तुमच्या शरीरात युरिक ॲसिड वाढले आहे. त्यामुळे तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करा.योग्य व्यायम करा. त्यामुळे तुम्हाला फायदा होण्यास मदत मिळेल.

Uric Acid Symptoms जाणून त्यांचे उपाय करण्यास विसरु नका. तुम्हाला नक्की फायदा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *