Constipation Home Remedies च्या शोधात आपल्यापैकी कितीतरी लोकं असतील. पचनाच्या समस्येमुळे निर्माण झालेला बद्धकोष्ठतेचा त्रास हा काही जणांसाठी अनेक शारीरिक समस्या घेऊन येतो. हा त्रास मोठ्यांमध्येच असतो असे नाही अनेक लहान मुलांना देखील हा त्रास होऊ लागला आहे. खाण्यापिण्याच्या सवयी आणि लाईफस्टाईल फरकामुळे हा त्रास हल्ली अनेकांना होतो. कोणतीही औषधं न घेता थोडे बदल केले तर अगदी घरच्या घरी Constipation Home Remedies करता येऊ शकतात. हे उपाय काही कठीण नाही. घरीच उपलब्ध असलेल्या गोष्टींमधून आपण आपला हा त्रास कमी करु शकतो.
Vitamin B12 ची कमतरता अशी करता येईल कमी
योग्य प्रमाणात पाणी
आपण खाल्लेले खाद्यपदार्थ पचण्यास पाणी मदत करत असते. काही जण जेवणासोबत पचनासाठी कोल्ड्रिंक्स पितात. त्यामुळे तुमचे अन्न न पचता ते तसेच राहते. पचनाची नैसर्गिक क्रिया त्यामुळे बाधित होते. जेवल्यानंतर साधारण 1/2 तासाने जर तुम्ही पाणी प्याल तर त्याची मदत ही अन्न पचण्यासाठी होईल. दिवसभरात किमान 3 लीटर पाणी तुम्ही प्याल तर तुमचे शरीर हायड्रेट राहील. त्यामुळे तुमच्या शरीरातून मल: विसर्जन होण्यास मदत मिळेल.
कार्बोदके Constipation Home Remedies
शरीरात पचनाची क्रिया सुरळीत चालण्यासाठी कार्बोदके असणेही गरजेचे असते. कार्बोदके योग्य प्रमाणात शरीरात गेली तर मल: निघणे हे अगदी सोपे होते.मल: नरम करण्यात त्याचा उपयोग होतो. त्यामुळे शरीरातून निघताना त्रास होत नाही. त्यामुळे गहू, तांदूळ, नाचणी, भाज्या असे पदार्थ तुम्ही खायला हवेत. जेणेकरुन तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही. (बद्धकोष्ठतेसाठी घरगुती उपाय)
फळ
फळांमध्ये मोठ्याप्रमाणात पाणी असते. त्यामुळे पोट स्वच्छ होण्यास मदत मिळते. शिवाय आपल्या पचनसंस्थेत अडकलेले मल काढून टाकण्यास मदत करते. पोट साफ होत नसेल तर अनेकदा फळांचे सेवन करण्यास सांगितले जाते. त्यामुळे मल ढकलण्यास मदत मिळते. म्हणून आहारात किमान दोन तरी फळं असावीत. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी केळी, सफरचंद, संत्री अशा फळांचे सेवन करावे.
तूप / तेल
पचनसंस्थेला वंगण देण्याचे काम तूप तेल सारखे पदार्थ करत असतात. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तुम्ही एक चमचा तेल किंवा तूप खावे. त्यामुळेही तुमचे पोट साफ होण्यास मदत मिळते. दररोज रात्री झोपताना तुम्ही एक चमचा तूप आणि तेल खावे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फरक झालेला जाणवेल.
आता जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तुम्ही हे काही सोपे उपाय नक्कीच करुन पाहू शकता.