vitamin b12vitamin b12

Vitamin B12 बद्दल तुम्ही नक्कीच ऐकले असेल. हल्ली 10 पैकी किमान 8 जणांना तरी या व्हिटॅमिनची कमतरता जाणवते. पण नेमकं कोणत्या कारणासाठी Vitamin B12 हे चांगले असते. त्याचा शरीरासाठी नेमका काय उपयोग असतो हे देखील माहीत असायला हवे.आपल्या शरीराला लागणाऱ्या अनेक व्हिटॅमिनपैकी Vitamin B12 हे एक अत्यंत महत्वाचे आहे. पण खूप जणांना याची कमतरता जाणवते आणि त्याचा परिणाम हा त्यांच्या आरोग्यावर होत राहतो. व्हिटॅमिन Vitamin B12 ही कमतरता नक्की कशी भरुन काढायची याची देखील माहिती आज आपण घेणार आहोत.

Vitamin B12 म्हणजे काय?

Vitamin B12 हे एक वॉटर सॉल्युबल असे व्हिटॅमि आहे. आपण जे खातो. त्या खाण्यातून आपल्या शरीराला मिळते. शरीराच्या अनेक क्रिया करण्याचे काम हे करत असते. अत्यंत महत्वाच्या अशा जबाबदाऱ्या पार पाडत असते. जर याची शरीरात कमतरता झाली की अनेक आरोग्यविषयक समस्या या आपल्याला उद्भवू शकतात. त्यामुळे आहारात अशा गोष्टी हव्यात ज्यामध्ये Vitamin B12 हे असते.

Vitamin B12 काय करते?

Vitamin B12 तुमच्या शरीरात जाऊन काय करते त्यासाठी वाचा याचे कार्य

  1. DNA च्या सिंथेसिससाठी Vitamin B12 हे महत्वाचे असते. त्यामुळेच आवश्यक ते घटक त्याला मिळतात.
  2. शरीरात असणाऱ्या लाल पेशींच्या निर्मितीसाठीही हे अत्यंत आवश्यक असते.
  3. आपल्या शरीरातील नव्हर्स सिस्टीम आणि त्यांच्या सेलसाठी ते अत्यंत लाभदायक असते.

Vitamin B12 कशात असते

कोणत्या खाद्यपदार्थातून तुम्हाला Vitamin B12 मिळू शकते हे देखील माहीत असायला हवे.

  1. चिकन, अंडी,मटण,दूध आणि दूधाचे पदार्थ यातून आपल्यामध्ये असलेली ही कमतरता घालवता येऊ शकते.
  2. प्लॅंटबेस्ट प्राॅडक्टस यांच्यमध्ये तुम्हाला आवश्यक असलेले घटक मिळू शकतात

Vitamin B12 कमी झाल्याची लक्षणे

तुमच्या शरीरात कोणत्याही गोष्टीची कमतरता झाली की शरीर हे त्याप्रमाणे रिॲक्ट करु लागते. जर तुमच्या शरीरात काही बदल होत असतील तर तुम्हाला ही काही लक्षणे नक्कीच जाणवतील.

  1. शरीरात रक्ताची कमतरता होऊ लागते. ॲनिमियाचा त्रास होऊ लागतो.
  2. जर तुमच्या शरीरात याची जास्त काळासाठी कमतरता झाली तर मात्र तुम्हाला त्याचा अधिक त्रास जाणवतो. जसे चालण्यास अडथळा निर्माण होणे, हातापायांना मुंग्या येणेे वगैरे

शरीराची गरज ओळखून तुम्ही Vitamin B12 चे सेवन करा. हल्ली काही गोळ्याही मिळतात. पण त्यांचे सेवन डॉक्टरांना विचारुन मगच करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *