Role Of Water हे प्रत्येकासाठी जाणून घेणे फारच गरजेेचे आहे. पाणी हे सगळ्या सजीवांसाठी फारच महत्वाचे आहे. पण प्रत्येकासाठी पाण्याची गरज ही वेगवेगळी असते. पाणी हे जीवन आहे म्हणून त्याच्याशिवाय जगता येणे कठीणच आहे. पण तुम्ही असा कधी विचार केला आहे का? की तुमच्यासाठी किती पाण्याचे सेवन गरजेचे आहे. मुळातच पाणी तुमच्या शरीरासाठी काय काय करते हे तुम्हाला माहीत आहे का? या लेखाच्या निमित्ताने Role Of Water नेमके काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत.
Role Of Water म्हणजे काय?
आपण केवळ तहान लागली म्हणून पाणी पित नाही. तर त्या व्यतिरिक्तही पाण्याचे काही कार्य शरीरासाठी फारच महत्वाचे असते. पचनक्रियेसाठी पाणी महत्वाचे असते. कारण अन्नावर प्रकिया करण्याचे काम पाणी करते. याशिवाय अन्नातून शरीराला सत्व पुरवण्याचे काम पाणी करत असते. खाल्लेले अन्न शरीरातून बाहेर काढण्याचे कामही पाणीच करते. त्यामुळे केवळ तहान भागवणे नाही तर शरीराच्या काही अन्य क्रिया करण्याचे काम पाणी करते. त्यामुळेच पाण्याचे अनन्यसाधारण असे महत्व आहे.
किती पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले
आता राहिला प्रश्न पाणी पिण्याचा तर पाण्याचे किती सेवन करायला हवे याचेही एक गणित आहेच. त्याविषयीची अधिक माहिती घेऊया जाणून
- Naturopathy नुसार पाणी हे सतत पिणे चांगले नाही. जो पर्यंत तुम्हाला तहान लागत नाही तोपर्यंत तुम्ही पाणी पिणे गरजेचे नाही. तुम्हाला ज्यावेळी तहान लागेल तेव्हाच पाणी प्या असा सल्ला दिला जातो.
- पाणी पिणे हे तुमच्या पचनाला चालना देते. पण जेवल्यानंतर लगेच पाणी पिणे अजिबात चांगले नाही. तुम्ही साधारण 30 मिनिटांनी पाणी प्यायल हवे. म्हणजे तुम्ही जे खाल्ले आहे पचण्यास मदत मिळेल.
- दिवसभरातून ३ लीटर पाणी प्यायला हवे. त्यामुळे शरीराला असणारी पाण्याची गरज ही पूर्ण होते. पण आपण दिवसभरात विविध पदार्थ खातो त्यामध्ये पाणी असतेच. त्याचा विचार करुन पाणी प्यायला हवे.
- जास्त पाणी प्यायल्याने त्वचा सुंदर राहते असा विचार करत असाल तर असे अजिबात नाही. कारण सतत कारण नसताना पाणी प्यायल्यामुळे त्याचा परिणाम हा लघवीवर होतो. पोटात दाब आल्यामुळे लघवी रोखून धरण्याची क्षमता ही कमी होऊ लागते. त्यामुळे जास्ती पाणी पिऊ नये.
पाणी किती प्यायचे हे कळले असेल तर माहिती नक्की शेअर करा.