Skin Glow With Pranayama

Skin Glow With Pranayama या विषयाची आज आपण अधिक माहिती घेणार आहोत. त्वचा तुकतुकीत चकचकीत आणि चिरतरुण असावी असे कोणाला बरे वाटत नाही. योगसाधना हा असा सोपा आणि कमी खर्चिक असा उपाय आहे ज्यामुळे तुम्हाला इच्छित असलेले सौंदर्य प्राप्त होऊ शकते. खूप जणांना तुम्ही प्राणायम करताना पाहिले असेल. या प्राणायमामुळे तुमचे त्वचेचे सौंदर्य अबाधित राहण्यास मदत मिळते. हे तुम्ही जाणता का? नसेल तर आज आपण प्राणायमाचा तुमच्या त्वचेवर आणि सौंदर्यावर कसा सकारात्मक परिणाम होतो ते जाणून घेऊया.

Yoni Mudra 2024 | महिलांनी या कारणासाठी रोज करायला हवी योनी मुद्रा

प्राणायम म्हणजे काय?

जर तुम्ही योगाचे जाणकार नसाल तर तुम्हाला प्राणायामची योग्य माहिती नसणे स्वाभाविक आहे. योगसाधनेमधील प्राणायाम हा अत्यंत महत्वाचा असा प्रकार आहे. अगदी कोणत्याही वयात तुम्ही प्राणायम करु शकता. प्राणायाम म्हणजे विविध पद्धतीने शरीरात श्वास घेणे होय. यामध्ये अनुलोम- विलोम, कपालभाती, भस्रिका, भ्रामरी अशा प्राणायामाचा समावेश होतो. यामध्ये श्वसनाचे वेगवेगळे प्रकार सांगितले जातात. जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्याचाच एक फायदा म्हणजे ‘चिरतारुण्य’ तुम्हाला इच्छित असलेले सौंदर्य यामुळे अबाधित राहण्यास मदत करते कशी ते आता आपण जाणून घेऊया.

प्राणायाममुळे का चमकते त्वचा Skin Glow With Pranayama

वर सांगितल्याप्रमाणे प्राणायाममध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने श्वास घेण्यास शिकवले जाते. यामध्ये Deep Breathing असते. ज्यामुळेच शरीराला अधिकाधिक फायदा मिळत असतो.

  1. दीर्घ श्वास घेतल्यामुळे आपल्याला लागलेली कमी श्वास घेण्याची सवय ही हळुहळू कमी होते. आपण जो श्वास घेतो. तो अनेकदा अपुरा आणि घाईघाईत घेतलेला असतो. त्यामुळे पूर्ण श्वास घेण्याची आपली सवय ही कमी झालेली असते. प्राणायाममध्ये तुम्हाला पूर्ण श्वास घेण्यास सांगितले जाते. या श्वसनाच्या सवयीमुळे तुम्ही शरीरात पूर्ण श्वास घेता ज्यामुळे तुम्हाला रिलॅक्स होण्यास मदत मिळते.
  2. प्राणायाम तुम्हाला श्वास घेण्यासाठी काही नियम लावते. ज्यामध्ये अनेकदा श्वास रोखून धरणे आणि सोडणे असते. यामुळे शरीराला आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवठा होतो. जो तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत करुन त्याचा फायदा त्वचेला करुन देतो.
  3. प्राणायाममधील ‘कपालभाती’ हा प्रकार असा आहे ज्यामध्ये तुम्हाला श्वास आत बाहेर जलदगतीने घ्यावा लागतो. त्यामुळे तुमच्या शरीरातून टॉक्झिन्स निघून जाण्यास मदत मिळते. शरीरात जास्त प्रमाणात ऑक्सिजन आल्यामुळे उर्जा ही मिळते. कपालभातीच्या सवयीमुळे तुमचे कपाळ चमकते.
  4. हार्मोन्सचे संतुलन राखण्यासही प्राणायम हे खूप जास्त महत्वाचे असते. तुम्ही प्राणायम सुरु केल्यानंतर तुम्हाला हार्मोन्समुळे सुरु झालेल्या समस्या कमी होण्यास मदत मिळते. अनेक महिलांना हार्मोन्सच्या बदलामुळे त्वचेची समस्या जाणवू लागते ती प्राणायामाच्या सवयीने आटोक्यात येण्यास मदत मिळते.
  5. प्राणायम केल्यामुळे तुमच्या मनावर तुमचा ताबा राहतो. तुमची चंचलवृत्ती कमी होते. तुमचे मन स्थिरावते त्यामुळे तुम्ही अधिक समाधानी, शांत आणि अधिक उर्जात्मक होता.

आता सुंदर, चमकदार त्वचा हवी असेल तर दररोज Skin Glow With Pranayamaप्राणायम करायला विसरु नका.

वाचा नवदुर्गांची नावे आणि त्यामागील कथा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *