Heat Stroke Easy Home Remedies

तापमानाचा पारा वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात रुग्णांना उष्माघाताचा झटका बसला आहे. खूप जास्त शरीराचे तापमान मेंदू आणि शरीराच्या इतर महत्वाच्या अवयवांचे नुकसान करते. वयोवृध्द व्यक्ती तसेच लठ्ठपणा, ताप, निर्जलीकरण, हृदयविकार, रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत नसणे, अतिनील किरणांचे त्वचेचे नुकसान होणे, आणि अंमली पदार्थ आणि अल्कोहोलचा सेवनामुळे शरीराचे तापमान संतुलित राखणे गरजेचे आहे. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. 

वयस्कर व्यक्ती, गर्भवती स्त्रिया आणि लहान मुले यांना उष्णतेशी संबंधित आजाराचा अधिक धोका असतो. नवी मुंबई आणि मुंबईतील तापमानामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येते. वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लोकांनी सतर्क राहून उष्माघातापासून बचाव केला पाहिजे. उष्ण हवामानात व्यायाम अथवा शारीरिक मेहनत देखील उष्माघातास कारणीभूत ठरू शकतात. उष्माघाताशी संबंधित जोखीम टाळण्यासाठी आणि कमी करण्यासाठी व्यक्ती आणि समाजाने योग्य उपाययोजना आखणे महत्वाचे आहे. डॉ. सचिन नलावडे, वरिष्ठ सल्लागार (फिजिशियन), डायबेटोलॉजिस्ट आणि इंटेन्सिव्हिस्ट, मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)

(वाचा – उन्हाळ्यातला सुखद ‘थंडावा’, प्रियदर्शिनी – शिवालीचा समर कूल लुक)

उष्माघाताचा सामना करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

हायड्रेटेड राहा: घामामुळे शरीराचे डिहायड्रेशन होण्यापासून रोखण्यासाठी भरपूर पाणी, लिंबुपाणी आणि शहाळ्याचे सेवन करा. चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड यांसारखी पेय तसेच कॅफिन किंवा अल्कोहोलयुक्त पेय टाळा. ताजी फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश करून चांगल्या आहाराचे सवयींचे पालन करा.

शरीराचे तापमान नियंत्रित राखा: हवेशीर जागेत रहा. थंड पाण्याने आंघोळ केल्याने तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित राखण्सास मदत होते आणि शरीरातील उष्णता कमी करता येते.

आरामदायी कपडे घाला: सर्वच वयोगटातील लोकांनी चांगले सुती आणि हलक्या रंगाचे सैल कपडे वापरले पाहिजे. अतिउष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी टोपी, स्कार्फ, गॉगलचा वापर करा.

सनस्क्रिन लावाः तुम्ही घराबाहेर असाल तर 50 पेक्षा जास्त एसपीएफ असलेले सनस्क्रीन लावा आणि तज्ञांच्या निर्देशानुसार दर दोन तासांनी पुन्हा त्वचेवर सनस्क्रिन लावा.

व्यायाम टाळाः बाहेरचे तापमान जास्त असताना शारीरिक व्यायाम करणे टाळा. अशावेळी संध्याकाळी व्यायाम करावा . गरम तापमानात व्यायाम करू नका, त्याऐवजी प्रत्येकासाठी इनडोअर वर्कआउटची शिफारस केली जाते. दुपारी १२:०० ते ४:०० या वेळेत घराबाहेर पडणे टाळा.

(वाचा – ४५ च्या पार होईल उष्णतेचा पारा! Heat Stroke पासून वाचण्यासाठी करा ५ सोपे उपाय)

याकडे लक्ष द्या 

  • अतिउष्णतेचा त्रास टाळण्यासाठी पार्क केलेल्या कारमध्ये लहान मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना एकटे सोडू नका
  • जास्त वजन असल्याने तुमच्या शरीराचे तापमान सामान्य करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो आणि तुम्हाला अधिक उष्णतेचा सामना करावा लागतो. त्यासाठी लठ्ठपणासारखी समस्या आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. शरीर थंड ठेवण्यासाठी हलका आहार घ्या
  • उष्णतेची सवय लावा: तुम्ही वातानुकुलीत वातावरणात बराच वेळ घालवत आहात का? गरम हवामानाची सवय होण्यासाठी 10-15 मिनिटे बाहेरच्या वातावरणात हलका व्यायाम करा. शरीराला उष्णतेमध्ये दीर्घकाळ व्यायाम करण्याची सवय होण्यासाठी सुमारे 10 दिवस लागू शकतात
  • गर्भवती महिलांना उष्माघाताची लक्षणे जसे की चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे किंवा मळमळ होणे यांसारखी लक्षणे आढळल्यास त्यांना वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे. उष्ण हवामानात योग्य उपाय करून गरोदर स्त्रिया उष्माघाताच्या जोखमीपासून स्वतःचे आणि त्यांच्या बाळांचे रक्षण करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *