Curry Leaves Water Benefits: कढीपत्त्याचा सुगंध आणि त्याची चव आपल्या सर्वांना आकर्षित करते. हे सामान्यतः सांबर, डोसा आणि नारळाची चटणी इत्यादी दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये वापरले जाते. तर आपल्याकडे आमटी, भाजी यामध्येही याचा वापर करण्यात येतो.
हा आयुर्वेदाचा खजिना मानला जातो कारण त्यात अनेक औषधी गुणधर्म आणि अँटी-ऑक्सिडंट आढळतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पण तुम्ही कढीपत्त्याचे पाणी प्यायले आहे, आणि ते आरोग्यासाठी चांगले आहे की नाही? भारतातील प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ निखिल वत्स यांनी सांगितले की, कढीपत्त्याचे पाणी आपल्यासाठी अनेक प्रकारे उपयुक्त ठरू शकते, त्याचे फायदे पाहूया. (फोटो सौजन्य – iStock)
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

कढीपत्त्याचे पाणी वजन कमी करणारे पेय म्हणून देखील वापरले जाऊ शकते, त्याच्या सेवनाने केवळ लठ्ठपणा कमी होत नाही तर कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते, तथापि त्याचा परिणाम काही दिवसांनीच दिसून येईल. कडिपत्त्याच्या पाण्याचा तुम्ही रोज सकाळी नियमित वापर करावा.
(वाचा – जंक फूड खाऊन वाढवले होते परिणिती चोप्राने ‘चमकिला’साठी १५ किलो वजन, कसे केले कमी)
उत्तम पचनक्रिया

ज्यांना पचनाच्या समस्या आहेत त्यांनी कढीपत्ता खाणे आवश्यक आहे कारण त्यामध्ये रेचक आढळतात ज्यामुळे आपल्या पोटाचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता आणि जुलाब यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत नाही.
(वाचा – Weight Loss Mistakes | वजन कमी करताना टाळा या चुका)
शरीराच्या डिटॉक्सिकेशनसाठी

कढीपत्त्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, खरेतर या पानांमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचेचे संक्रमण, त्वचेच्या समस्या आणि फ्री रॅडिकल्सचा धोका कमी होतो.
(वाचा – Diet Food | तुम्हीदेखील Fatty Liver ने झालात हैराण? नाश्त्यापासून जेवणापर्यंत खा सँपल डाएट)
मानसिक आरोग्यासाठी

सध्याच्या काळात अनेकांना मानसिक तणावाचा सामना करावा लागतो, त्यामागे अनेक कारणे असू शकतात, जसे की प्रेम आणि मैत्रीमध्ये विश्वासघात, कामाचा ताण, पैशाची कमतरता, आजारपण इ. मात्र, कढीपत्त्याचे पाणी प्यायल्यास तणाव कमी होण्यास खूप मदत होते.
टीप: प्रिय वाचक, आमच्या बातम्या वाचल्याबद्दल धन्यवाद. ही बातमी फक्त तुम्हाला माहिती देण्यासाठी लिहिली आहे. हे लिहिताना आम्ही घरगुती उपाय आणि सामान्य माहितीची मदत घेतली आहे. जर तुम्ही तुमच्या आरोग्याशी संबंधित काहीही वाचले असेल तर ते अवलंबण्यापूर्वी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.