CSK vs LSG

CSK vs LSG मॅच हायलाइट्स: IPL 2024 च्या 34 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला असून लखनौने चेन्नई सुपर किंग्जचा 8 गडी राखून पराभव केला. लखनौचाहा चौथा विजय असून चेन्नई सुपर किंग्जला तिसरा पराभव स्वाकारावा लागलाय. लखनौने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत 6 बाद 176 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौने 19 षटकांत 180 धावा करत विजयाची नोंद केली. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

राहुल – डीकॉकची तुफान बॅटिंग 

सीएसकेने दिलेल्या 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केएल राहुल आणि क्विंटन डी कॉकच्या खेळीमुळे लखनऊचा विजय निश्चित झाला. सलामीला आलेल्या या दोन फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 134 धावांची मोठी भागीदारी केली. डी कॉकने 43 चेंडूत 54 धावांची खेळी केली. त्याने 5 चौकार आणि 1 षटकार मारला. कर्णधार केएल राहुलने 53 चेंडूत 82 धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून 9 चौकार आणि 3 षटकार आले. या दोघांशिवाय निकोलस पूरन 23 धावांवर नाबाद राहिला आणि मार्कस स्टोइनिस 8 धावांवर नाबाद राहिला.

(वाचा – MI Vs PBKS | IPL 2024: पंजाबवर MI ने मिळवला रोमांचक विजय, पंजाबच्या जबड्यातून खेचून आणला सामना)

चेन्नईची बॉलिंग फ्लॉप 

या सामन्यात चेन्नईचे बॉलर्स पूर्णपणे फ्लॉप होताना दिसले. मुस्तफिझूर रहमान आणि मथिशा पाथिराना वगळता उर्वरित गोलंदाजांना एकही बळी घेता आला नाही. पथिराणा आणि रहमान यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. मात्र, रहमाननेही 43 धावा दिल्या. तुषार देशपांडेने 4 षटकांच्या स्पेलमध्ये 42 धावा दिल्या. जडेजाला एकही विकेट मिळाली नाही. त्याने 3 षटकात 32 धावा दिल्या. दीपक चहरने 3 षटकांत 26 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळू शकली नाही. 

(वाचा – IPL 2024 | आयपीएलमध्ये या ५ युवा खेळाडूंचा जलवा, लवकरच उघडतील टीम इंडियाचे दरवाजे!)

जडेजा – माहीची फटकेबाजी वाया 

अखेरच्या षटकांमध्ये धोनीचा धमाका आणि रवींद्र जडेजाच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने या सामन्यात निर्धारित 20 षटके खेळून 176/6 धावा केल्या. मात्र, जडेजा आणि धोनीची ही खेळी व्यर्थ गेली. जडेजाच्या बॅटमधून 40 चेंडूत 57 धावांची नाबाद खेळी पाहायला मिळाली. त्याच्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकारांचा समावेश होता. 

(वाचा – Mohammed Shami 2023 | टीममधून बाहेर आत्महत्येचाही आला विचार, आयुष्याशी केला संघर्ष आणि मिळवला मान शामीचा असाही प्रवास)

धोनी 28 धावा करून नाबाद राहिला. या धावा त्याने अवघ्या 9 चेंडूत करून चाहत्यांना खुष केले. याशिवाय मोईन अलीने ३० धावांची खेळी केली. अजिंक्य रहाणे 36 धावा करून बाद झाला तर ऋतुराज गायकवाड 17 धावा करून बाद झाला. याशिवाय इतर फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. लखनौकडून कृणाल पांड्याने सर्वाधिक 2 बळी घेतले. मोहसीन खान, यश ठाकूर, रवी बिश्नोई आणि मार्कस स्टॉइनिस यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *