मध्य प्रदेशातील SDM च्या मृत्यूमुळे चांगलीच खळबळ माजली होती. निशा नापित यांचा खून झाला आहे असा संशय पोलिसांना होता. त्यानुसार पोलिसांनी अवघ्या 24 तासात या खूनाचा छडा लावला आहे. केवळ एका वॉशिंग मशीनवरुन त्यांनी आरोपीला शोधून काढले आहे. हा आरोपी अन्य कोणी नसून तिचा पती मनीष शर्मा असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. त्याने रचलेला बनाव आणि हत्येचे कारण ऐकल्यानंतर कोणालाही संताप आल्यावाचून राहणार नाही.
Pune Crime 2024 | लखनऊच्या तरुणाने पुण्यात येऊन केली इंजिनीअर तरुणीची हत्या
मध्यप्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यातील शाहपुरा येथे राहणाऱ्या SDM यांचा अचानक मृत्यू झाला. प्रकृति अस्वस्थामुळे त्यांना पतीने रुग्णालयात आणले. परंतु तिच्या मृत्यूचा संशय असल्यामुळे पोलिसांनी पोस्टमार्टम केले. त्या पोस्टमार्टम अहवालामध्ये तिचा मृत्यू हा रुग्णालयात आणण्याच्या आधी 4-5 तासांपूर्वी झाला होता. त्यामुळे पोलिसांना तिची अधिक चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी घरातही शोध घेण्यात आला. त्यावेळी मशीमध्ये काही कपडे धुवून सुकवण्यात आले होते. यामध्ये उशीचे कव्हर, चादर आणि निशा यांचे कपडे होते. ही गोष्ट पोलिसांना पटली नाही. त्यामुळे त्यांनी मनीष याची अधिक चौकशी करण्यास सुरुवात केली. या चौकशीमध्ये त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. मनीषने निशाचची हत्या केली होती. त्याने उशीने तिचे तोंड दाबून तिला मारुन टाकले. तिला मारताना तिच्या नाकातोंडातून रक्त आले होते.ते लपवण्यासाठी त्याने तिचे कपडे मशीनला लावून धुवून ठेवले. तिला रुग्णालयात नेण्याचा कांगावा केला.
अधिक तपासानंतर त्याने ही गोष्ट केवळ आपल्या स्वार्थापोटी केली होती. 2020 साली या दोघांचे लग्न झाले. शादी डॉट कॉमवरुन त्यांचे लग्न जुळले होते. निशाने तिच्या सर्व्हिस बुकमध्ये त्याचे नाव टाकले नव्हते. शिवाय नॉमिनी म्हणूनही त्याला कुठेही ठेवले नव्हते याचा राग मनीषला होता. त्यामुळेच त्याने तिला मारले वरुन गुन्हा लपवण्याचा प्रयत्न देखील केला, असे पोलिसांनी सांगितले.