पुण्यात आयटी इंजिनीअरींग मुलीची हत्यापुण्यात आयटी इंजिनीअरींग मुलीची हत्या

Pune Crime 2024 पुण्यात एक धक्कादायक प्रकार हिंजवडी या उच्चभ्रू परिसरात घडला आहे. एका लखनऊच्या तरुणाने पुण्यात असणाऱ्या एका तरुणीची हत्या केली आणि शांत डोक्याने पसार होण्याचा प्रयत्न केला. परंतु तो फोल ठरला. त्यामुळे काही दिवसांपूर्वी झालेल्या पुण्यातील हत्याकांडाचा उलगडा झाला आहे. पुण्यातील एका ओयो हॉटेलमध्ये एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. तिची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. एका आयटी सेक्टरमध्ये इंजिनीअरच्या पदावर काम करणाऱ्या या तरुणीला येथे बोलावून कोणी मारले असेल? याचा तपास सुरु असतानाच तिचा बॉयफ्रेंडने गुन्ह्याची कबुली दिली. परंतु हे सगळे प्रकरण काय? चला घेऊया जाणून

पुण्यातील हिंजवडी येथे वंदना द्विवेदी (26) नावाची तरुणी एका आयटी कंपनीत कामाला होती. मूळची लखनऊची असलेली वंदना पुण्यात नुकतीच आली होती. तिचे लखनऊत राहणाऱ्या ऋषभ निगम नावाच्या मुलावर प्रेम होते. परंतु पुण्यात आल्यापासून तिचे त्याच्यासोबत सतत बोलणे होत नव्हते. ती आपल्या कामात व्यग्र असे. दिवसभर काम करुन आल्यानंतर ती घरी येऊन थकून जायची त्यामुळे तिला ऋषभशी पूर्वीसारखे काही केल्या बोलता येत नव्हते. ऋषभला तिचे हे वागणे काहीतरी चुकीचे असल्यासारखे वाटू लागले. त्याला तिच्यावर संशय येऊ लागला. पुण्यात जाऊन तिचे कोणा इतराशी प्रेम जुळले असेल असे त्याला वाटू लागले. त्यामुळे त्याने तिला भेटण्याचे ठरवले. 25 जानेवारी रोजी तो पुण्यात आला. तो वंदनाला भेटला. त्या दिवशी वंदना त्याच्यासोबत हॉटेलमध्ये राहिली नाही. त्यामुळे त्याला ते अधिकच विचित्र वाटले. दुसऱ्या दिवशी त्याने तिला परत भेटण्यासाठी बोलावले. त्या दोघांनी चांगला वेळ देखील घालवला. तेथून हॉटेलमध्ये आल्यानंतर म्हणजेच 27 जानेवारीच्या रात्री वंदनावर पाच गोळ्या झाडल्या. तिला मारल्यानंतर तेथे काहीच झाले नाही असे भासवून तो हॉटेलमधून पसार देखील झाला. (Pune Crime 2024)

ऋषभ गुन्हा करुन त्या हॉटेलमधून निघाल्याचे सीसीटीव्ही फुटेज आहेत. त्यात तो अत्यंत शांत दिसत आहे. त्याने मुंबई गाठली. तो पर्यंत हिंजवडी येथे वंदनाच्या खुनाचा प्रकार उघडकीस आला होता. पोलिसांच्या समोर मास्टर की ने दरवाजा उघडल्यानंतर त्यांना वंदनाचा मृतदेह दिसला. मुंबईला पसार झालेल्या ऋषभकडे बंदूक असल्याचे कोणीतरी पोलिसांना कळवले त्यानंतर त्याला पोलिसांना ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर त्याने वंदनाचा खून करुन आल्याची माहिती दिली. तातडीने मुंबई पोलिसांनी ही माहिती हिंजवडी पोलिसांना दिली आणि ऋषभला ताब्यात घेण्यात आले.

केवळ संशयावरुन त्याने वंदनाचा खून केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *