देशातील गंगा ही अत्यंत पवित्र अशी नदी आहे येथे जगभरातून भाविक आपले पाप धुण्यासाठी येतात. पण याच गंगेत सतत बुडवून एका जोडप्याने आपल्या मुलाचा जीव घेतला आहे. दिल्लीतून आलेल्या या दांम्प्याने हर की पैडी या ठिकाणी हा सगळा प्रकार केला आहे. मुलगा पाण्यात बुडतोय हे पाहूनही त्यांनी त्याला सतत बुडवले. आजुबाजूच्या लोकांनी ही घटना पाहताच त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला परंतु तो पर्यंत त्या मुलाचा मृत्यू झाला होता. इतक्या चांगल्या दिसणाऱ्या या दांम्पत्याने असे का केले? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान पोलिसांनी या दांम्पत्याला अटक केली असून त्यांच्या चौकशीतून काही धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला आहे.
दिल्लीचे कुटुंब … हरिद्वारमध्ये या कारणासाठी आले
गंगेत स्नान करण्यासाठी अनेक लोक येतात. दिल्लीतील एक कुटुंब आपल्या मुलाला घेऊन हरिद्वारला पोहोचले. टॅक्सी घेऊन ते हर की पैडी या ठिकाणी पोहोचले. येथे आल्यानंतर त्यांनी गंगेत स्नान करण्याच्या बहाण्याने मुलाला पाण्यात सतत बुडवले. तो बुडतो आहे हे पाहून आजुबाजूच्या लोकांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. परंतु ते ऐकण्यास तयार नव्हते. त्यांनी मुलाला बुडवणे सुरुच ठेवले. आजुबाजूच्या लोकांनी या जोडप्याला मारहाण केली. त्या मुलाला काढले आणि पोलिसांना बोलावले. मुलाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण त्या आधीच त्याचा मृत्यू झाला होता.
आपल्याच मुलाला का मारले?
आपल्याच पोटच्या मुलाला मारण्याची अशी वेळ त्यांच्यावर का आली असेल असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. या संदर्भात त्या दांमप्त्याची चौकशी करण्यात आली त्यांनी त्यावेळी सांगितले त्याने चांगलाच धक्का बसला. त्यांनी माहिती दिली की, त्यांचा 5 वर्षांचा मुलगा ब्लड कॅन्सरने ग्रस्त होता. गंगेत स्नान केल्यानंतर त्याचा आजार बरा होईल असे सांगितल्यानंतर ते त्याला घेऊन हरिद्वारला पोहोचले. परंतु त्यांचे म्हणणे असे आहे की, तो मुलगा इथे आणताच त्याचा मृत्यू झाला होता. तो पुन्हा जिवंत होईल या आशेने त्यांनी त्याला गंगेत स्नान घालण्यास सुरुवात केली.
ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला आहे. परंतु नक्की अंधश्रद्धेमुळे मुलाचा मृत्यू झाला आहे का? यावर अजूनही पोलीस तपास करत आहेत.