डबेवाले करणा करणार मदतडबेवाले करणा करणार मदत

Maratha Aarakshan मराठा आंदोलनाचे वादळ आता नवी मुंबईत येऊन धडकले आहे. उद्या हे वादळ मुंबईत येणार आहे. मुंबईत कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये. कोणी मराठा आंदोलक उपाशी राहू नये याची जबाबदारी आता मुंबईच्या डबेवाल्यांनी घेतली आहे. जे कोणालाही उपाशी ठेवत नाहीत. असे मुंबईचे डबेवाले आता आंदोलकांनाही उपाशी ठेवणार नाहीत. मुंबईचे डबेवाले आपल्याकडून जितकी करता येईल तितकी मदत करणार आहेत.

आंदोलनाचा परिणाम हा नेहमीच व्यवस्थेवर होत असतो. मुंबईसारख्या ठिकाणी ज्यावेळी असे आंदोलन होते. त्यावेळी अनेक गोष्टी विस्कटतात. शहराची ही घडी विस्कटली की, त्याचा त्रास सगळ्यांनाच भोगावा लागतो.शहरातील सुविधांवर देखील ताण येतो. अशा परिस्थितीत मराठा आंदोलकांना आणि शहराला याचा त्रास होऊ नये यासाठी मुंबईचे डबेवाले हे अधिक डबे आपल्यासोबत घेणार आहेत. शिवाय रोटी बँकेतून ज्यांना गरज आहे त्यांना जेवण पुरवणार आहेत. त्यामुळे कोणीही उपाशी मरणार नाही. मुंबईचे डबेवाले हे जास्तीकरुन मराठा समाजाचे आहेत अशावेळी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांच्या पाठीशी मुंबईचे डबेवाले खंबीर उभे राहणार आहेत.

ज्या मराठा समाज बांधवांना आंदोलनकर्त्यांना जेवण द्यायचे असेल व त्यांच्याकडे वाहतुकीची काही सोय नसेल तर त्यांनी डबेवाला रोटी बॅन्कच्या 8424996803 या हेल्प लाईन नंबर वर संपर्क साधावा असे देखील आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *