मराठा आरक्षणाचे वादळ मुंबईत धडकणारमराठा आरक्षणाचे वादळ मुंबईत धडकणार

Maratha Aarakshan चे वादळ येत्या 24 तासात मुंबईत धडकणार आहे. मराठ्यांना आरक्षण मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही. अशा पवित्र्यात असलेले मराठा आरक्षणाचे जरांगे पाटील यांचे राज्यात विविध ठिकाणी स्वागत केले जात आहे. त्यांच्यासोबत आलेल्या जनसमुदायासाठी राहण्याची सोय आणि जेवणाची सोयही अनेक ठिकाणी करण्यात आलेली आहे. मराठा आरक्षणावर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. आहोत तिथूनही परतण्याची तयारी आरक्षणकर्त्यांनी मागितली आहे. यावर विचारविनियम होण्याची शक्यता आहे. हे झाले नाही तर उद्या मराठ्यांचं हे वादळ मुंबईत आल्यावाचून राहणार नाही.

मराठा आरक्षणासंदर्भात अधिक सांगायचे झाले तर ज्या मराठ्यांना गरज आहे अशा गरजवंत मराठ्यांना मराठा आरक्षण देण्यात यावे. त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. आंदोलन हे अतिशय शिस्तबद्धपद्धतीने व्हावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. जो कोणी या दरम्यान उद्रेक करेल अशांना पोलिसांनी ताब्यात घ्यावे असे देखील यावेळी जरांगे पाटील म्हणाले आहेत.

सध्या हा सगळा जमाव नवी मुंबईत आला आहे. त्यांची सोय करण्यासाठी APMC मार्केट हे देखील दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे आणि सगळ्यांची सोय करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा या नंतर खरंच मार्गी लागतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *