राम मंदिर स्टेशन परीसरात आगराम मंदिर स्टेशन परीसरात आग

Ram Mandir Station Fire मुंबईतील उपनगरीय स्टेशन राम मंदिर या स्टेशनच्या बाहेरील एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना नुकतीच घडली आहे. या आगीचे कारण अद्याप कळलेले नाही. परंतु काळजी घेण्यासाठी म्हणून या रेल्वे स्थानकावरुन वाहतूक थांबवण्यात आली आहे. स्टेशनकडे जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार राम मंदिर स्टेशन बाहेर लागलेल्या या इमारतीत तळमजल्यावरील एका गोदामाला आग लागली आहे. या आगीमध्ये भंगाराचे साहित्य जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. ही आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु आहे.या ठिकाणी पाण्याचे 12 टँकर आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *