Bigg Boss 17 चा निकाल लागला आहे मुन्नवर फारुकीने यंदाच्या सीझनच्या जेतेपदाचा मान मिळवला आहे. अनेकदा घरात एखादा मोठा कलाकार असेल तर तोच जिंकेल असे अनेकांना वाटते. परंतु गेल्या काही सीझन्सपासून जो चांगला खेळतो तोच विनर होतो असे दिसून आले आहे. परंतु कालचा ग्रँड फिनाले हा अधिक लक्षात राहिला तो अभिनेत्री अंकिता लोखंडेमुळे. विजेतेपदाच्या रेसमधून तिच्याशी कधीही न पटवून घेतलेल्या मनारा चोप्राच्या आधी ती बाहेर पडली. त्यानंतर तिचा चेहरा पाहण्यासारखा होता अशा काही कमेंटस तिच्या बाबतीत होताना दिसत आहे. तिचे एकूणच वागणे आणि तिचा प्रवास यामुळे ती या आधीही ट्रोल झाली आहे.
टॉप 3 मध्ये मिळवू शकली नाही जागा
अंकिता लोखंडे या खेळात पती विकी जैनसोबत आल्यानंतर अंकिताच हा सीझन जिंकेल असे वाटले होते. परंतु अंकिताचा संपूर्ण प्रवास पाहता तिने या घरात काही विेशेष केले असे प्रेक्षकांना वाटले नाही. त्यामुळेच ती टॉप 5 पर्यंत तरी कशी पोहोचली असा प्रश्न केला जात होता. परंतु एका मोठ्या मालिकेचा प्रसिद्ध असा चेहरा असलेली अंकिता ही अन्य काही कारणांमुळेही चर्चेत होती. टॉप 3 ज्यावेळी निवडण्यात आले त्यावेळी तिच्यासोबत मनारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि मुनव्वर होते. मनारा आणि तिचे संपूर्ण सीझनमध्ये कधीही पटले नाही. विकीशी असलेल्या संबंधावरुनही तिने अनेकदा तिला टार्गेट केले होते. परंतु तिला डावलून मनाराला लोकांनी अधिक पसंती दिली हे तिच्या काही पचनी पडले नाही असे तिच्या चेहऱ्यावरुन दिसत असल्याचे प्रेक्षक म्हणत आहे. त्यामुळे तिला आपली हार पचवता येत नाही असे म्हणत अनेकांनी ट्रोल केले आहे.
अंकिता लोखंडेचा तोचतोचपणा
अंकिता लोखंडेचे नाव सुशांत सिंह राजपूतशी जोडले आहे. तिने या घरात अनेकदा त्याचा विषय काढला. त्याच्या मृत्यूसंदर्भात आणि त्या लढ्याबद्दल ती सतत स्वत:हून बोलताना दिसली. त्यामुळे ही केवळ आपल्याकडे लोकांचे अधिक लक्ष द्यावे यासाठी ती असे करते असे जाणवले. दुसरीकडे मुन्नवर फारुकीच्या नात्यात असलेली गडबड त्यावेळी मात्र तिने मुनव्वरला अत्यंत गलिच्छ माणूस असे वागवले. त्यामुळे सोयीस्कर रित्या ती सारे काही आपण किती चांगले हे दाखवण्यासाठी करते असे दिसत असल्याचे प्रेक्षकांना वाटते.
विकीसोबतची भांडणं
संपूर्ण सीझनमध्ये विकी- अंकिता यांच्यामधील दुरावा आणि भांडणंच दिसत होती. त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध हे कायम ताण आणणारेच होते.त्यामुळेही अनेकांना कंटाळा आला होता. अनेकदा अंकिताचे वागणे हे खूप नाटकी वाटत होते. शेवटच्या काळात तिला तिची इमेज चांगली करण्याची संधी देण्यात आली. परंतु त्याचा काही फारसा फरक पडला असेल असे वाटत नाही.
तुम्हाला काय वाटतं खरंच अंकिता मनाराच्या पुढे जाण्यामुळे अधिक त्रस्त झाली होती?