New Scam Alert टेक्नॉलॉजी जशी पुढे जातेय तसे त्यातून काहीतरी मार्ग काढण्यासाठी scammer हे नव्या नव्या शकला लढवत असतात. आपल्या मेहनतीचे पैसे एका क्लिकवर कसे आपल्याकडून काढता येईल यासाठी त्यांचा हा प्रयत्न सुरु असतो. एक स्कॅम सगळ्यांना कळला की दुसरा असे स्कॅम सुरुच असतात. असाच एक नवा स्कॅम आता बाजारात आला आहे. स्कॅमचा हा प्रकार तसा स्कॅम वाटणार नाही. अगदी छान बोलून तुमच्याकडून तुमचे पैसे उकळण्याचा हा प्रकार आहे तरी काय चला घेऊया जाणून
तुमच्या खात्यात पैसे आले

तर हा नवा स्कॅम फारच स्मार्ट असा आहे. यामध्ये तुम्हाला एक मेसेज येतो. ज्यामध्ये तुमच्या खात्यावर काही पैसे टाकण्यात आले असे दाखवण्यात येते. एखाद्या बँकेने पाठवल्यासारखाच हा मेसेज असतो. ज्यामध्ये एक लिंक देखील दिलेली असते. ही रक्कम इतकी मोठी असते की, त्यानंतर तुम्हाला एक मेसेज येतो ज्यामध्ये कोणीतरी तुम्हाला चुकून पैसे पाठवल्याचे असते. ही व्यक्ती तुम्हाला मग त्याबद्दल सांगते की, आमच्या खात्यातून तुम्हाला चुकून काही पैसे वळते झालेले आहेत. तुम्ही ते पुन्हा पाठवावे. तर हा स्कॅम इथेच सुरु होतो. अनेकदा बॅलेन्स न पाहता आपण आले हा मेसेज पाहून लगेच पैसे पाठवण्याचे पाहतो. तो जे स्कॅनकर किंवा डिटेल आपल्याला देतो. त्यामुळे आपल्या खात्यातून लगेच पैसे जाण्यास सुरुवात होते.
तुम्हाला काय होते हे कळायच्या आत तुमच्याकडून सगळा पैसा गेलेला असतो. तुम्हाला असे मेसेजेस कोणी पाठवत असेल तर तुम्ही मेसेज मध्ये आलेल्या लिंकवर चुकूनही क्लिक करु नका. कारण त्यामुळे तुमची मेहनतीची जमापुंजी एका क्षणात जाण्याची शक्यता असते.