पैसे झटपट कमवण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण तुमच्या मेहनतीशिवाय तुम्हाला पैसा मिळू शकत नाही हे कायम लक्षात ठेवा. तुमची पैशाची गरज ओळखून अनेकदा काही लोकं तुम्हाला कधी लुबाडून जातात हे देखील तुम्हाला कळत नाही. असेच एका पुण्याच्या डॉक्टरांसोबत घडले आहे. शेअर मार्केटची आवड असल्याचे त्यांनी सोशल मीडियातून काही ओळख काढून आपला पैसा त्यात गुंतवला खरा पण त्यानंतर समोरुन त्यांना जी वागणूक मिळाले ते त्यामुळे ते चांगलेच हैराण झाले आणि त्यांनी पोलिस स्टेशन गाठले. नेमका हा प्रकार काय चला घेऊया जाणून
New Scam Alert | पैसे काढून घेण्याच्या या नव्या ट्रिकपासून सावधान
सोशल मीडियावरुन फ्रॉड
कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्मवर तुम्ही जर स्क्रोल केले तर तुमच्या आवडीचे 10 तरी व्हिडिओ तुम्हाला दिसतातच. पुण्यातील एका डॉक्टरांना शेअर मार्केटमध्ये फारच रस होता. त्यातच त्यांना एक जाहिरात दिसली ज्यामध्ये शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवून तुम्हाला लाखो कमावता येतील असे म्हटले होते. आपली आवड आणि फायदा लक्षात घेत त्यांनी लगेच त्या ठिकाणी संपर्क करुन आपली आवड सांगितली. त्यांनी सांगितलेल्या अकाऊंटवर सुरुवातीला 50 हजार पाठवले. ही रक्कम मिळाल्यांतर ही फारच कमी असल्याचे त्यांना समोरुन सांगण्यात आले. तसेच त्यांना एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यांना काही शेअर्स विकत घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे डॉक्टरांनी केले सुद्धा. त्यांना अगदी काहीच काळात जास्त नफा झाल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी लगेचच काही आणखी रक्कम खात्यावर वळती केली. त्यांना अपेक्षित असलेला नफा झाल्यानंतर त्यांनी ती रक्कम काढून टाकण्यासाठी संपर्क केला. परंतु ही रक्कम काढायची असेल तर तुम्हाला 30 टक्के रक्कम भरावी लागेल असे सांगण्यात आले. यात डॉक्टरांनी तब्बल 10 लाखांहून अधिक पैसे घातले होते.
त्यांना सतत पैसे काढण्याची विनंती करुन देखील त्यांनी टाळाटाळ केली. ज्यामुळे डॉक्टरांनी आपली फसवणूक लक्षात आली त्यांनी लगेच पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. त्यावेळी सगळा प्रकार समोर आला. मुळात शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवल्याचे त्यांना केवळ दाखवण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात असे मुळीच नव्हते. त्यांना केवळ त्या ॲपमध्ये पैसा असल्याचे दाखवण्यात आले होते. प्रत्यक्षात तो पैसा घेऊन समोरील व्यक्तीने त्यांना फसवले होते.
त्यामुळे शेअर मार्केटमध्ये तुमचा पैसा लावतो असे सांगून जर कोणी क्षमतेपेक्षा अधिक नफा देत असेल तर सावधान!