Health Budget 2024 नुकतेच सादर झाले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 1 फ्रेबुवारी रोजी आर्थिक अर्थसंकल्पीय बजेट सादर केले आहे. या बजेटमध्ये अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. परंतु प्रामुख्याने हे बजेट आरोग्याच्या दृष्टीकोनातून अधिक आरोग्यदायी ठरणार आहे. यात कोणतीही शंका नाही. नुकताच आपला देश कोरोनाच्या माहामारीतून बाहेर येऊन आपल्या पायावर पुन्हा एकदा उभा राहिला आहे. या काळातील अनेक गोष्टींसाठी त्यांनी कौतुक केले आहे. यंदा बजेटमध्ये आरोग्याकडे अधिक लक्ष देण्यात आले आहे. विशेषत: महिला आरोग्यासंदर्भात काही महत्वाचे निर्णय देखील घेण्यात आले आहेत. जे प्रत्येक स्त्रीला माहीत असणे गरजेचे आहे.
काय आहे हेल्थ बजेट 2024
- आयुष्यमान योजनेअंतर्गत अंगणवाडी आणि आशा सेविकांना मिळणार आरोग्य कवच
- अंगणवाड्या होणार अधिक सक्षम,पोषण आहार, महिलांची बाळंतपणाची काळजी याकडे दिले जाणार अधिक लक्ष
- माता आणि बाल आरोग्याच्या सेवेसाठी उचलली जाणार महत्वाचे पावले
- गर्भाशयाच्या कर्करोगावर मात करण्यासाठी 9 ते 14 वर्षांच्या मुलींचे होणार लसीकरण
- लसीकरणाचे व्यवस्थापन करण्यासाठी स्थापन केली जाणार नवी कमिटी. ज्यातून होणार महत्वाची कामे
महिलांच्या आरोग्यावर अधिक भर घालणारे बजेट तुम्हाला कसे वाटले? नक्की कळवा