SSC Board च्या परीक्षा येत्या 1 मार्चपासून सुरु होणार आहेत. बरोबर एक महिन्यानंतर या परीक्षा सुरु होणार असून या परीक्षांमध्ये काही महत्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत. जर तुमची मुलं किंवा ओळखीच्या व्यक्ती 10 वीत असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचणे फारच गरजेचे आहे. त्यामुळे पालकांसाठी ही माहिती अत्यंत महत्वाची आहे. हे बद ल नेमके कोणते आहेत चला घेऊयात जाणून
ऑनलाईन मिळणार प्रवेशपत्रे
अर्थात परीक्षांसाठी लागणारे हॉलतिकिट हे शाळा काढून देत असते. ऑनलाईन पद्धतीने यंदा ही येणार असून त्यासाठी mahasscboard.in वर ती उपलब्ध होणार आहेत. ज्याचे प्रिंट काढणे अनिवार्य आहे. परीक्षांना जाताना तुमचे हॉलतिकिट तुमच्यासोबत असणे फारच जास्त गरजेचे असते. म्हणूनच तुम्ही याचे आधीच प्रिंट काढून घ्या.
प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी मिळणार नाही वेळ
विद्यार्थ्यांचा प्रश्नपत्रिका वाचून गोंधळ होऊ नये. यासाठी त्यांना पूर्वी 10 मिनिटे दिली जात होती. जेणेकरुन त्यांना काय लिहायचे आहे किंवा प्रश्न काय आहे हे कळू शकेल. परंतु याचा फायदा पेपर फोडण्यासाठी होऊ लागल्यामुळे आता विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी वेळ दिला जाणार नाही. तर हा वेळ नंतर उत्तरपत्रिका तपासण्यासाठी दिला जाणार आहे. त्यामुळे पेपर फुटीचा गोंधळ टळेल असे बोर्डाचे म्हणणे आहे. हे पेपर पहिल्या सत्रात सकाळी 11 वाजता सुरु होतील आणि 2 वाजून 10 मिनिटांनी संपणार आहे. दहावीचा पहिला पेपर हा मराठी विषयाचा असणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर 10.30 वाजत हजर राहणे अनिवार्य असणार आहे.
आता हे बदल लक्षात घेऊन परीक्षांची तयारी करा.