ATV bike Accident Alibaug फिरायला गेल्यानंतर आपल्यापैकी कितीतरी जणांना ॲडव्हेंचर करायला आवडते. पण हाच ॲडव्हेंचर अनेकांच्या जीवावर बेतला असता अशी घटना नुकतीच अलिबाग येथे घडली आहे. मुंबईपासून जवळ असलेल्या निसर्गरम्य अशा अलिबाग बीचवर अनेक पर्यटक येतात. या ठिकाणी उंटावर बसणे, खास एटीव्ही बाईक चालवणे असे बरेच काही केले जाते. पण हेच करणे अनेकांच्या जीवावर बेतले असते असे एका वायरल व्हिडिओतून दिसून आले आहे. नेमकं हे प्रकरण काय चला घेऊया जाणून
5 वर्षांच्या मुलाला गंगेत बुडवून मारले,लोकांनी केली मारहाण… अंधश्रद्धेतून घडली घटना
SDM पत्नीच्या खुनाचा शोध लागला, या कारणामुळे झाली होती हत्या
अलिबाग येथे एटीव्ही बाईक दुर्घटना या अनेकदान घडतानाचे निदर्शनास आले आहे. गेल्यावर्षी इअर एंडसाठी आलेल्या पर्यटकांना याचा अनुभव देखील आला आहे. येथे एटीव्ही बाईक एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. ज्याचा गाडीवरुन ताबा सुटल्याने तो आधी एका महिलेला आणि मग उंटाला जाऊन धडकला. ज्यात महिलेच्या हातातून फोन पडला. गाडीवर बसलेली महिला खाली पडली. तर उंटाला धक्का लागल्यामुळे तो चांगलाच घाबरला आणि त्याने पाठीवर असलेल्या महिलेला जाऊन जोरात खाली पाडले.
येथील अधिक चौकशीनंतर ही गाडी चालवण्यासाठी हवी असलेली कागदपत्रे आणि परवानगी या मुलाच्या वडिलांकडेही नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे या दोघांवर बेदरकारपणे गाडी चालवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.