गेल्या सीझनमध्ये शालीन भनौत हा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत होता. कधी 250 ग्रॅम चिकन तर कधी लव अँगल… या सगळ्यामुळे तो अभिनय करतो असा ठप्पा त्याच्यावर पडला होता. घरात असताना अनेकदा बिग बॉसलाही त्याची किव आली. तर कधी कधी त्याच्या मूर्खपणामुळे काय बोलावे? असा देखील प्रश्न पडला. त्या सीझनची आठवण की काय आता अभिषेक कुमार ही शालीनच्या पावलावर पाऊल टाकत घरात उगीचच अँग्री यंग मॅन बनून फिरताना दिसत आहे. हे आम्ही नाही तर सोशल मीडियावरील काही पोस्टच सांगत आहे. अनेकांना शालीनची कॉपी करत अभिषेक घरात नाव करु पाहतोय असे वाटत आहे. जाणून घेऊया या विषयी अधिक
BB17 : घरात अंकिता- विकीमध्ये दुरावा
मुद्दाम करतो तमाशा
https://www.instagram.com/p/Cy4-mCkP8yP/
घरात एखादा मुद्दा सुरु असेल तर त्यातून भांडण काढून विकोपाला कशी न्यायची हे अभिषेकला चांगलेच माहीत आहे. त्याची चिडचिड ही त्यामुळेच बऱ्याचवेळा फेक सुद्धा वाटते. कॅमेराने अधिकाधिक काळ आपल्याकडे राहावे. यासाठी तो हे सारे कळतो हे आता लोकांनाही समजून आले आहे. नुकतेच त्याचे घरात मनारासोबत जे भांडण झाले त्यामध्येही तो उगाचच कारण नसताना अधिक आक्रमक झालेला दिसत आहे. एखाद्याला उगाच टार्गेट करुन तो भांडण काही तास चालवतो हे खूप वेळा दिसते. अधिकाधिक वेळा तो भांडण मुलींशीच करतो हे देखील दिसून आले आहे.
वीकेंडचा वार पडणार भारी
गेल्या सीझनमध्ये टीना आणि शालिनच्या अती जवळीकतेमुळे सलमानने त्याला चांगलेच फटकारले होते. लोकांना इंटरटेन करण्यासाठी मर्यादा सोडू नका असा देखील सल्ला दिला होता. अशातच इशा- अभिषेक हे एकमेकांना आधीपासून ओळखणारे जोडपे आहे. जे आता घरात वेगळे असल्याचे सांगूनही सतत एकमेकांच्या सोबत असतात. त्यांच्यातील गोंधळ ते कायमच ठेवताना दिसतात. त्यातच अभिषेकची सगळ्यांना नडण्याची आणि अतिशहाणपणा करण्याची सवय सलमानसमोर टिकणे थोडे कठीणच आहे.
तुम्हाला काय वाटते? शालिनसोबत अभिषेकची तुलना होणे हे अगदी बरोबर आहे का?