बिग बॉस 17 च्या घरात आता नात्यांची वेगवेगळी समीकरण जुळायला सुुरुवात झाली आहेत. तर काही समीकरणं ही बिघडताना देखील दिसत आहे. या घरात #couplegoal म्हणून आलेले अंकिता लोखंडे आणि विकी जैन आता मात्र एकमेकांपासून दूर दूर झालेले दिसत आहे. विकीचा खेळ आणि अंकिताचा पझेसिवपणा या सगळ्यात कुठेना कुठे दिसत आहे. त्यामुळे घरात यांची एक स्ट्राँग कपल अशी चर्चा होण्याच्या ऐवजी या दोघांमधील दुरावाच अधिक दिसून येत आहे.
विकीला नसतो वेळ
या घरात आल्यापासून विकी आपली एक मंडली करु पाहात आहे. त्याला असा एक ग्रुप तयार करायचा आहे ज्यामुळे त्याला पुढे जाण्यास अधिक मदत होईल. त्यामुळे तो आल्यापासून या घरात वेगवेगळी नाती तयार करतोय. खेळाच्या दृष्टीकोनातून ही चांगली गोष्ट आहे. पण कारण इथे आल्यानंतर प्रत्येकाला आपला खेळ हा खेळावाच लागतो. पण त्यासोबतच ज्यावेळी घरात कोणतेही कपल एंट्री करते. त्यावेळी त्या सगळ्यांची नजर ही त्या कपलच्या नात्यावरही असते. विकी हा अनेकदा लहान मुलांसारखा वागताना दिसतो. शिवाय तो अनेकदा एकमेकांमध्ये भांडणं लावतानाही दिसतो. त्यामुळेही तो आता अनेकांना आवडत नाही असे झाले आहे. विकी हे सगळे करताना अंकिताला कुठेच वेळ देताना दिसत नाही. या सगळ्यात अंकिताचा खेळ खराब होण्याची शक्यता आहे.
अंकिताला आहे खेळाची गरज
यंदा बिग बॉसने बायस असल्याचे आधीच सांगितले आहे. त्यामुळे अंकिताला अनेकदा फेवर मिळताना दिसते. अंकिताला बिग बॉसकडूनही खास सल्ला देण्यात आला. तिला थेरपी देण्यात आली. तिने स्वत:ला ओळखून त्यानुसार खेळायला हवे. नाहीतर या घरात तिचा निभाव लागणे कठीण आहे. यंदा या खेळासाठी असे स्पर्धक आले आहेत. जे इतर क्षेत्रातील मातब्बर आहे. त्यांचे डोके हे या टीव्ही कलाकारांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे जर या सगळ्यात टिकायचे असेल तर तिला कंबर कसण्याची खरी गरज आहे.
आता या नंतर अंकिताचा खेळ नेमका कसा असेल हे येत्या काळात कळेल.