bb17 scriptedbb17 scripted

BB चा शो सुरु झाला की, हा शो स्क्रिप्टेड आहे अशी कायम चर्चा होते. प्रत्येक सीझनमध्ये काही काळानंतर सुरु होणारी भांडणं पाहून तर असंच वाटतं. पण आताच्या या सीझनमध्ये तर अगदी सुरुवातीपासूनच हा शो स्क्रिप्टेड (scripted) असल्याची चर्चा होऊ लागली आहे. घरात दुसरा आठवडा सुरु झाला आहे. पण घरात होणारी भांडणं क्षुल्लक आणि उगाच ड्रामा वाढवणारी आहेत असे दिसून येत आहे. घरात दुसऱ्याच आठवड्यात झालेली वाईल्ड कार्ड एंट्री करण्यात आली आहे. ज्यामुळे घरात अपेक्षित वाद होण्यास सुरुवात झाली आहे. कोणत्या कारणामुळे यंदाचा सीझन स्क्रिप्टेड वाटतोय चला जाणूया अधिक

शालीनची कॉपी सापडली, अभिषेक कुमार बनू पाहतोय शालीन भनोत

घरात समर्थची एंट्री

घरात असलेली टीव्ही मालिकेतील अभिनेत्री इशा मालविया हिचे खरे आयुष्य हे ही एकदम फिल्मीच वाटत आहे. अभिषेक कुमार सोबत तिची जवळीकता वाढत असताना या घरात तिचा सध्याचा बॉयफ्रेंड समर्थ याची एंट्री झाली. त्यामुळे अभिषेक आणि इशा पुन्हा एकत्र येतील असे वाटत असताना त्या दोघांमध्ये दुरावा आला आहे. इशा एकाच वेळी समर्थ आणि अभिषेक यांना खेळवत आहे असे देखील दिसून येत आहे. इशाची या खेळात गोची झालीय खरी. पण हे एखाद्या स्क्रिप्टेड मालिकेप्रमाणेच वाटत आहे. एवढ्या मोठ्या स्क्रिनवर आधी अभिनेषक इशाची भांडण आणि त्यानंतर समर्थ- इशाची भांडण त्यांच्या ‘उडारिया’ मालिकेचा भागच वाटत आहे.

विकीचा अतिशहाणपणा

अंकिता- विकीचा तर घरात अजबच कारभार पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर अगदी नजर न लागो अशी असलेली ही जोडी घरात आल्यापासून सतत भांडणं करताना दिसत आहे. विकी या खेळात अगदी पहिल्या दिवसापासून मास्टर माईंड बनू पाहात आहे. त्याचा हा प्रयत्न अगदी सगळ्यांच्याच लक्षात येत आहे. इतरांना जवळ करताना अंकितावर तो सतत ओरडताना दिसत आहे. आता असे करणे त्याला अधिक स्क्रिनटाईम देईल यात काही शंका नाही. पण त्यामुळे अंकिताचे घरात राहणे कठीण होणार आहे. विकी जैन कुठेतरी अंकिताच्या वरचढ जाऊन अतिशहाणपणा करायचा प्रयत्न करतोय यात कोणतीही शंका नाही.

अभिषेकचा तमाशा

Read more: BB17 : का वाटतोय यंदाचा सीझन स्क्रिप्टेड, वाचा
https://www.facebook.com/ColorsTV/videos/6694636263905720

घरात एकच व्यक्ती सतत चर्चेत असते ती म्हणजे अभिषेक कुमार… या घरात कधी मजनू तर कधी अँग्री यंग मॅन बनून तो फिरत असतो. त्याचे एकूणच सगळे वागणे स्क्रिप्टेड असते असे वाटते. तो सतत आक्रमक होऊनही त्याला काहीच केले जात नाही. पण त्याचा हा पॅटर्न आता चांगलाच लक्षात येऊ लागला आहे.

घरात अन्य काही चेहरे आहेत जे नुसते या घरात आहेत ते काहीही करत नाही. यंदाचा हा शो स्क्रिप्टेड असू शकतो का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *