अरबाज-शूरा लव्हस्टोरीअरबाज-शूरा लव्हस्टोरी

Arbaaz-Shura Love Story आज आपण जाणून घेणार आहोत. बॉलिवूडमध्ये रोज नव्या प्रेम कहाणी ऐकायला आणि पाहायला मिळतात. काही लव्हस्टोरी या पूर्ण होतात तर काही कारणामुळे बिनसतात. पण आता एका नव्या कपलकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहेत. वयाच्या 53 व्या वर्षी अरबाज खानने पुन्हा एकदा लग्न करण्याचा निर्णय घेतला तो कोणासोबत लग्न करतोय हे सगळे काही एक गुपित होते. परंतु त्यांचे फोटो आले आणि लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले कसे? हे वाचायला आवडेल का? जाणून घ्या या दोघांची छोटीशी लव्हस्टोरी

Serial kisser पण आहे Best Husband, वाचा इम्रान-परवीन हाश्मीची लव्हस्टोरी

Dawood- Mandakini Love story| दाऊदसारखा मोठा डॉन पडला मंदाकिनीच्या प्रेमात… वाचा यांची लव्हस्टोरी

पहिल्या नजरेत झाले प्रेम Arbaaz-Shura Love Story

अरबाज-शूरा असे पडले प्रेमात

अरबाजनेच त्याच्या या छोट्याशा लव्हस्टोरीचा उलगडा केला आहे. त्याने एका मुलाखतीदरम्यान त्यांच्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. अरबाजने सांगितले की, शुरा ही मेकअप आर्टिस्ट आहे. अनेक सेलिब्रिटींचा मेकअप तिने केला आहे. त्यामुळे ती अनेक चित्रपटांच्या सेटवर असते. अरबाज खानच्या प्रॉडक्शनचा चित्रपट ‘पटना शुक्ला’ या चित्रपटाच्या सेटवर शुरा आणि अरबाज यांनी पहिली भेट झाली. या पहिल्या भेटीतच त्यांचे एकमेकांशी प्रेम झाले. या सेटवर ते अनेकदा एकमेकांना भेटले. तब्बल 9 महिने कोणालाही न सांगता डेट केल्यानंतर त्यांनी अखेर खान परिवाराला याची माहिती दिली. संपूर्ण खान परिवार या बातमीने आनंदी झाले. लग्नाची तारीख येईपर्यंत ही बातमी कोणालाच कळू दिली नाही.

लग्नात दिसत होते खूपच सुंदर

अरबाज आणि शुराच्या लग्नासंदर्भात पॅप्सना काहीतरी माहिती होती हे नक्की! कारण ते त्याला ज्यावेळी काही हिंट देऊन लग्नाची तारीख विचारत होते. त्यावेळी त्याने सगळ्यांना शांत राहा असे सांगितले. पण त्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी या दोघांच्या लग्नाचे फोटो आले. शुरा ही 41 वर्षांची असून ती बॉलिवूडसाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते. या दोघांनी लग्न अगदी साध्या आणि जवळच्या खास लोकांमध्येच केलेले दिसत आहे. लग्नासाठी त्यांनी फ्लोरल अशी थीम घेतलेली दिसते. त्यानुसार शुरा- अरबाज हे दोघे त्या स्टाईलमध्ये दिसत आहे.

पहिलं लग्न तुटलं

अरबाज आणि शूराचं हे दुसरं लग्न आहे. शूराबद्दल अद्याप कोणालाही काही माहिती नाही. परंतु अरबाज खान याचे लग्न सगळ्यांना माहीत आहे. अरबाज खान- मलायका अरोरा यांनी 1998 साली लग्न केले. त्यांना अरहान खान नावाचा एक मुलगा आहे. जो सध्या अभ्यासासाठी देशाबाहेर असतो. मलायका आणि अरबाज यांच्या नात्यात काही वर्षांपासून वितुष्ट सुरु होते. त्यांनी 2017 ला वेगळे होणयाचा निर्णय घेतला. त्यांनी त्याचे फार काही कारण मीडियाला दिले नाही. त्यामुळे त्यांचे लग्न तुटले यावर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. पण प्रत्यक्षात त्यांनी कोणते कारण दिले नाही. मलायका सध्या अर्जुन कपूरसोबत नात्यात आहे. त्यांनी अद्याप लग्न केलेले नाही. परंतु लग्न करुन अरबाज आता नव्या नात्यात अडकला आहे यात काही शंका नाही.

नात्यातील अंतर

अरबाज आणि शूर यांच्यामध्ये तब्बल 12 वर्षांचे अंतर आहे. हल्ली अनेक जण वयाने मोठा असलेला किंवा मोठी असलेली जोडीदार निवडतात. नात्यातील हे अंतर सुरुवातीला काही वाटत नाही. परंतु एक जनरेशनचा गॅप असेल तर जोडीदारासोबत जुळवून घेणे थोडे कठीण होऊन जाते. त्यामुळेच हल्ली अनेक नाती तुटताना दिसतात. हे काहींच्या बाबतीत खरे असले तरी काहींच्या बाबतीत असे काही होत नाही. त्यांचे नाते अगदी छान सुरु राहते.

अरबाज- शूराच्या या लव्हस्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटते?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *