Acidity Home Remedies हे आपल्यापैकी कित्येक जणांना हवी असेल कारण आताच्या खाण्याच्या पद्धतीमुळे लहानांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत खूप जणांना ॲसिडिटीचा त्रास होतो. अनेक जण ॲसिडिटीसाठी खूप उपचारही घेतात. पण तरीही त्याचा त्रास काही आटोक्यात येत नाही. पण काही सोप्या घरगुती उपायांनी आणि काळजी घेऊन आपल्याला ॲसिडीटीचा त्रास कमी करता येऊ शकतो. पण ॲसिडिटी होण्याआधी तुम्हाला त्यामागील कारणे देखील जाणून घ्यायला हवी.
Yoni Mudra 2024 | महिलांनी या कारणासाठी रोज करायला हवी योनी मुद्रा
ॲसिडिटी का होते?
ॲसिडिटीचा त्रास का होतो हे जाणून घेणे गरजेचे असते. कारण जो पर्यंत आपल्याला मुळ कारण माहीत नसेल तर आपल्याला त्यावर कोणता उपाय करायचा हे कळणार नाही. म्हणून ॲसिडिटीचे मुख्य कारण जाणून घ्या. अनेकदा काही जणांना आहारात चुकीच्या गोष्टी घेतल्यामुळे याचा त्रास होऊ लागतो. उदा. कॉफी, चहा, मैद्याचे पदार्थ यामुळे खूप जणांना ॲसिडिटीचा त्रास होतो. काही जणांना उलट्या, डोकेदुखी, ढेकर येणे असे काही त्रास होऊ लागतात. मुळातच ॲसिडिटी होण्यामागे तुमच्या चुकीच्या खाण्याच्या पद्धतीचा परिणाम असतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट खाताना त्याची योग्य वेळ आणि योग्य प्रमाण असणे फारच जास्त गरजेचे आहे.
घरच्या घरी अशी घालवा ॲसिडिटी Acidity Home Remedies
घऱच्या घरी काही सोप्या उपायांनीही याचा त्रास कमी करता येऊ शकतो. घरातील अगदी साध्या साध्या गोष्टी करुन त्याचा त्रास कमी करायचा असेल तर वाचा हे 100% कामी येणारे उपाय
- थंडगार दूध हे ॲसिडिटीवर कमाल काम करते. जर तुम्हाला ॲसिडिटी घालवण्यासाठी एकदम बेस्ट असा पर्याय आहे. एक कपभर थंडगार दूध प्यायल्यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळण्यास मदत मिळते.
- ॲसिडिटीमुळे डोकं जड झाले असेल तर अशावळी कोकमचा आगळ घेऊन त्यात थोडेसे मीठ आणि पाणी घालून ते प्यावे. त्यामुळे तुम्हाला उलटी होते आणि बरे वाटते.
- जर तुम्हाला दूध आवडत नसेल तर अशावेळी तुम्ही व्हॅनिला आईस्क्रिम खाल्ले तरी देखील तुम्हाला आराम मिळण्यास मदत मिळते.
- आलं हे दाह कमी करण्यासाठी फारच जास्त फायद्याचे असते. आलं ठेचून ते पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्यामुळे तुम्हाला आराम मिळण्यास मदत मिळते.
- केळं हे देखील ॲसिडिटीसाठी फारच फायद्याचे असते. जर तुम्हाला असा त्रास होऊ लागला आणि तुम्ही केळ्याचे सेवन केले तर तुम्हाला नक्कीच बरे वाटेल.
- नारळाचे पाणी हे देखील त्यासाठी खूपच फायद्याचे मानले जाते. नारळाच्या पाण्यामध्ये असलेले अल्केलाईन घटक हे ॲसिडिटीची जळजळ क्षमवण्यासाठी फारच फायद्याचे ठरतात.
- बडीशेप ही देखील ॲसिडिटी कमी करण्यासाठी उत्तम आहे. बडिशेप चघळून खायला घ्या. तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
- पाणी प्यायल्याने देखील तुम्हाला बरे वाटेल. एक एक घोट थोडं थोडं पाणी पित राहा. त्यामुळे ॲसिडिटीची जळजळ कमी होण्यास मदत मिळते.
आता ॲसिडिटी झाली तर Acidity Home Remedies करायला अजिबात विसरु नका. यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होण्यास मदत मिळेल.