मराठा आरक्षण, धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या अनेक ठिकाणी आंदोलनं सुरु आहेत. काही आंदोलने ही आक्रमक स्वरुपातील आहे तर काही संयमाच्या मार्गाने सुरु आहे. आरक्षण हे समाजाच्या उन्नतीसाठी आहे. समाजातील काही जातींना याचा फायदा व्हायला हवा यासाठीच आरक्षण मिळवण्याचा अनेकांचा हट्ट आहे. पण त्याचं आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या ट्विटर वॉर सुरु असलेले दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आरक्षणाच्या मुद्दयावर ट्विट केलं आणि त्याला आमदार आणि धनगर आरक्षणासाठी लढणारे गोपीचंद पडळकर यांनी उत्तर दिले आहे. त्यांच्यात हे ट्विट वॉर नेमके काय झाले चला घेऊया जाणून.
‘महाराष्ट्र-धर्म’ संपवण्याचे काम एक आधुनिक ‘अनाजी पंत’ करत आहेत
रोहित पवार हे सध्या संघर्ष यात्रेवर आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर ट्विट करत त्यांनी लिहिले की,
#युवा_संघर्ष यात्रेत साडे चारशे किमी पायी चालल्यानंतर एक गोष्ट जाणवली ती म्हणजे पूर्वीच्या काळात मराठेशाही एका ‘अनाजी पंत’ ने संपवली आताच्या काळामध्ये ‘महाराष्ट्र-धर्म’ संपवण्याचे काम एक आधुनिक ‘अनाजी पंत’ करत आहेत. #अनाजी_पंत
पडळकरांनी दिले प्रत्युत्तर
रोहित पवार यांनी ट्विट केल्यानंतर त्यांची कानउघडणी करणारे अनेक ट्विट सर्वसामान्य नागरिकांनी देखील केले आहेत. पवार घराणाच्या संबंध हा जातीयवाद करण्याचा आहे असे देखील अनेकांनी म्हटले आहे. पण पडळकरांनी त्याला आपल्या भाषेत उत्तर दिले आहे.
तुमच्या माहिती करता
@RRPSpeaks स्वराज्याची स्थापना आठरापगड जातींनी केली. पण त्यावर घाव घालणारे सुर्याजी पिसाळ आणि गणोजी शिर्के होते आणि मा.@Dev_Fadnavis यांनी गरीब मराठा समाजाला दिलेले आरक्षण घालवणारे आपले जातीयवादी आजोबाच@PawarSpeaks आहेत.
आता या दोघांच्या द्विटनंतर त्यांच्या समर्थकांनी देखील आपआपली मत मांडत त्यांना टार्गेट केले आहे. दरम्यान हे ट्विट वॉर इथेच थांबणार की, त्याला अजून काही वळण मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.