धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आमदार गोपीचंद पडळकर हे आग्रही होताना दिसत आहेत. त्यांनी शांततेच्या मार्गाने आरक्षण मिळवण्यासाठीची ही लढाई सुरु ठेवली आहे. पण आता त्यांच्या एका वक्तव्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी मराठा आरक्षणाचा चेहरा असलेले जरांगे पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘आरक्षण हवंय पण बाबासाहेब सन्मान द्यायला तयार नाहीत.
ते पुढे म्हणाले की, आम्हाला अभिमान आहे की डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेत आरक्षण दिले. त्यामुळेच आमचे एकच साहेब बाबासाहेब!पण काही पुरोगामी म्हणून मिरवणाऱ्या नेत्यांनी निर्माण केलेले जातीयवादी माणूस आरक्षण मागतो पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सन्मान द्यायला व त्यांचे नाव घ्यायला तयार नाही. अशी टीका त्यांनी केली आहे.
आता हा मुद्दा पुढे कोणते वळण घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.