IBS

इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (IBS) हा एक सामान्य विकार आहे. जो मोठ्या आतड्याला प्रभावित करतो. या विकारात ओटीपोटात दुखणे, पोटात गोळा येणे, गॅस आणि बद्धकोष्ठता अशी लक्षणे दिसून येतात. शौचालयाचा वापर केल्यानंतर अनेकांना थकवा आणि पोट रिकामे न झाल्यासारखे वाटते. आयबीएस असलेले बरेच लोक त्यांच्या स्थितीमुळे चिंताग्रस्त किंवा तणावग्रस्त असतात आणि त्यांचा आत्म-सन्मान कमी असतो. 

आयबीएस सह जगताना त्यांच्या लक्षणांवर यशस्वीरित्या नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही बाबींचा सामना करणे महत्वाचे आहे. डॉ. मेघराज इंगळे, संचालक आणि वरिष्ठ सल्लागार गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग, ग्लेनईगल्स हॉस्पिटल, परेल, मुंबई यांनी अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)

( वाचा – Vitamin Deficiency | दातदुखी आणि तोंडाच्या दुर्गंधीने असाल हैराण, तर शरीरात आहे या विटामिन्सची कमतरता)

तणाव हे याचे मुख्य कारण आहे. मानसिक तणावामुळे ही स्थिती आणखी गंभीर होऊ शकते. ग्लूटेन, दुग्धजन्य पदार्थ आणि उच्च किण्वनक्षम ऑलिगोसॅकराइड्स, डिसॅकराइड्स, मोनोसॅकराइड्स आणि पॉलीओल्स (FODMAP) सारख्या खाद्यपदार्थांमुळे आयबीएस होतो.  जर तुम्हाला इरिटेबल बाऊल सिंड्रोम असेल तर तुम्ही कार्बोनेटेड पेये अजिबात घेऊ नका. 

या पेयांचा आतड्यांवर प्रभाव पडतो आणि अतिसार होऊ शकतो. त्यांचे सेवन टाळणे चांगले. आयबीएसची लक्षणे व्यवस्थापित केल्यास ते जीवनाची एकूण गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात. तुम्हाला माहीत आहे का? आतड्यांमधील बॅक्टेरियाचे नाजूक संतुलन प्रतिजैविकांचा वापर, आहारातील बदल किंवा संसर्ग यांसारख्या घटकांमुळे विस्कळीत होऊ शकते, ज्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल त्रास होतो. 

(वाचा – Reheat Food | ५ असे पदार्थ जे दुसऱ्यांदा गरम करून खाल्ले तर शरीरात तयार होते विष, नाव वाचून व्हाल हैराण)

शिवाय, जीवनशैलीतील घटक जसे की शारीरिक हालचालींचा अभाव किंवा झोपेची गुणवत्त खराब होते.  आयबीएससाठी लक्षणे ओळखणे आणि नियंत्रित करणे या दीर्घकालीन स्थितीसह जगणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे. लक्षणे ओळखून आणि जीवनशैलीत तसेच आहारात योग्य बदल करून यास प्रतिबंध करता येतो

आयबीएस असलेल्या अनेक व्यक्तींमध्ये सूज येणे, गॅस आणि पोटदुखीची समस्या असते. जी योग्य पोषक आहाराने दूर करता येते. यामध्ये आहारतज्ज्ञांचे कार्य महत्वाचे ठरते. व्यायाम आणि तणाव व्यवस्थापन तंत्र जसे की ध्यान, योग किंवा श्वासोच्छवासाचे व्यायाम हे देखील लक्षणे नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. आयबीएस सारख्या समस्येपासून दूर राहण्याकरिता तज्ज्ञांची भेट घ्या. आतड्याच्या हालचालींमध्ये होणाऱ्या बदलांकडे वेळीच लक्ष द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *