घरात बदलू लागली समीकरणे

Bigg Boss Marathi 15 च्या भाऊचा धक्का झाल्यानंतर समीकरणं बदलताना दिसतात. तशीच घरातील काही समीकरणं आता पुन्हा एकदा बदलू लागलेली आहेत. आधी या घरात अरबाज- निकीचे जे नाते होते ते या आठवड्यात काहीसे दुश्मनीमध्ये बदलेले दिसून आले. पण तरीही या दोघांमध्ये काहीतरी आहे असे दिसून आले आहे. टीम A मधील काही सदस्य आता बिथरलेले दिसून आले आहे. वैभव, जान्हवी, अंकिता अशी टीम दिसून आली आहे. तर निकी- अभिजीत अशी टीम दिसून आली आहे. घरातील एकूणच बदललेल्या समीकरणामुळे सगळा खेळ हा पूर्णपणे बदलणार आहे हे नक्की!

Bigg Boss Marathi 5 : त्या टीमचे वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) एक शेपूट

अरबाज आणि निकीमध्ये ताटातूट

अरबाज- निकीमध्ये प्रेमसंबंध निर्माण झालेले दिसून आले होते. पण अरबाज हा बाहेर कमिटेट असल्याची बातमी देखील वाऱ्यासारखी पसरली होती. पण घरात निकी आणि अभिजीतची वाढती मैत्री निकीला इतकी खटकली होती की निकी आणि अरबाजच्या नात्यात वितुष्ठता आली असे दिसून आले पण भाऊच्या धक्क्यावर त्यांच्या प्रेमाचा व्हिडिओ दाखवल्यानंतर घरातल्यांच्या मनातही शंका निर्माण झाली आहे.

दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा कायम लाभ होतो हे आपण पाहिले आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे यंदाचे कॅप्टनपद कारण जान्हवी आणि वैभवला कॅप्टनपद देण्याऐवजी घरातील सगळ्यांनी मिळून वर्षा उसगावकर यांना कॅप्टन पद दिले. त्यामुळे या भांडणाचा फायदा नक्कीच हा वर्षा उसगावकर यांना झाला यात काही शंका नाही.

आता या पुढच्या आठवड्यात अजून किती समीकरणं बदलणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *