भारतातील रस्ते परिवहन क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे, जेथे देशातील ६० टक्क्यांहून अधिक मालवाहतूक केली जाते. पण, रस्ता सुरक्षितता आजही मोठी समस्या आहे. २०२४ मध्ये मीडिया अहवालांमधून निदर्शनास येते की प्राधिकरणांनी ओव्हरलोडिंग, बेपर्वा ड्रायव्हिंग यांसारख्या उल्लंघनांसाठी ५५,०४८ चलान जारी केले, जे २०२३ मध्ये नोंदणी करण्यात आलेल्या २८,४२२ चलानच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. व्यावसायिक वाहनांचा समावेश असलेल्या रस्ते अपघातांमुळे जीवितहानी होण्यासोबत पुरवठा साखळी देखील विस्कळित होते आणि कार्यचालन खर्च वाढतो.
टाटा मोटर्स ही भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी प्रगत तंत्रज्ञान, इंटेलिजण्ट ताफा व्यवस्थापन आणि ड्रायव्हर प्रशिक्षण उपक्रमांच्या माध्यमातून रस्ता सुरक्षिततेला प्राधान्य देते.
”आमच्या डिझाइन तत्त्वामध्ये सुरक्षिततेला अधिक प्राधान्य दिले जाते. सुधारित केबिन्सपासून सर्वोत्तम नियंत्रणांपर्यंत आमच्या ट्रक्सचा प्रत्येक पैलू ड्रायव्हर आरामदायीपणा आणि रस्ता सुरक्षितता वाढवण्यासाठी डिझाइन केला जातो,” असे टाटा मोटर्सच्या ट्रक्स विभागाचे उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख श्री. राजेश कौल म्हणाले.
सुधारित ब्रेकिंग, हिल-स्टार्ट असिस्ट आणि कोलिजन मिटीगेशन यांसारखी प्रगत सुरक्षितता वैशिष्ट्ये मोठ्या प्रमाणात प्रमाणित बनत आहेत. अॅडवान्स्ड ड्रायव्हर असिस्टण्स सिस्टम्स (एडीएएस) आजही व्यावसायिक वाहनांमध्ये उदयास येत असताना त्यांच्यामध्ये भविष्यात सुरक्षित ट्रकिंगसाठी मोठी क्षमता आहे.
इंटेलिजण्ट ताफा व्यवस्थापन रस्ता सुरक्षिततेमध्ये अधिक क्रांती घडवून आणत आहे. टाटा मोटर्सचा कनेक्टेड वेईकल्स प्लॅटफॉर्म फ्लीट एज रिअल-टइाम वेईकल ट्रॅकिंग सक्षम करतो, ड्रायव्हिंग वर्तणूकीबाबत ड्रायव्हरला अलर्ट करतो आणि भावी देखभालीबाबत माहिती देतो. ”आमचा कनेक्टेड वेईकल प्लॅटफॉर्म फ्लीट एजसह ऑपरेटर्स डेटा-संचालित निर्णय घेऊ शकतात, जे सुरक्षितता, कार्यक्षमता आणि लाभक्षमता सुधारतात,” असे श्री. कौल पुढे म्हणाले.
फक्त तंत्रज्ञान पुरेसे नाही, कुशल ड्रायव्हर्स देखील आवश्यक आहेत. टाटा मोटर्स भारत सरकारसोबत सहयोगाने देशभरात सहा ड्रायव्हर प्रशिक्षण संस्थांचे कार्यसंचालन पाहते. या संस्था ड्रायव्हर्सना संरक्षणात्मक ड्रायव्हिंग तंत्रे, आधुनिक वेईकल हाताळणी कौशल्ये आणि रस्ता सुरक्षितता सर्वोत्तम पद्धतींसह सुसज्ज करतात.
सुरक्षितता नैतिक कर्तव्य असण्यासोबत व्यवसायासाठी गरज आहे. सुरक्षिततेला प्राधान्य देणाऱ्या फ्लीट ऑपरेटर्सना कमी विमा खर्च, कमी डाऊनटाइम आणि सानुकूल कार्यसंचालनांमधून फायदा होतो. सुव्यवस्थित, सुरक्षितता-केंद्रित ताफा दीर्घकालीन गुंतवणूक आहे, जी कार्यक्षमतेला चालना देते आणि ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करते.
भारतातील ट्रकिंग उद्योग महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. वेईकल डिझाइनमध्ये सुरक्षिततेला समाविष्ट करत, ताफा व्यवस्थापनाचा फायदा घेत आणि ड्रायव्हर प्रशिक्षणामध्ये गुंतवणूक करत टाटा मोटर्स रस्ते परिवहनाला सुरक्षित, स्मार्टर व अधिक शाश्वत करण्याप्रती कटिबद्ध आहे.