सॅमसंगचे कूलिंगसॅमसंगचे कूलिंग

उन्‍हाळ्यामध्‍ये रात्रीच्‍या वेळी आरामदायी झोप मिळण्‍यासाठी करावा लागणारा संघर्ष अखेर संपला आहे. सॅमसंग हा भारतातील आघाडीचा ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँड आपले नवीन इनोव्‍हेशन ‘कस्‍टमाइज्‍ड कूलिंग’सह होम कूलिंगला नव्‍या उंचीवर घेऊन जात आहे. हे अद्वितीय वैशिष्‍ट्य सॅमसंग स्‍मार्ट एअर कंडिशनर्स आणि डब्‍ल्‍यूडब्‍ल्‍यूएसटी (वर्क्‍स विथ स्‍मार्टथिंग्‍ज) प्रमाणित पंखे व स्विचेसना सिन्‍क्रोनाइज करते, ज्‍यामधून विनाव्‍यत्‍यय आरामदायीपणा मिळतो, तसेच ऊर्जा कार्यक्षमता ऑप्टिमाइज होते.
आपण सकाळच्‍या वेळी थकलेल्‍या अवस्‍थेत का जागे होतो?

झोप व कूलिंगमागील विज्ञान

भारतातील वीजेची मागणी दरवर्षाला ६ ते ७ टक्‍क्‍यांनी वाढत आहे, ज्‍यामध्‍ये उन्‍हाळ्यादरम्‍यान एअर कंडिशर्सच्‍या वाढत्‍या वापरामुळे अधिक भर होत आहे (आयईए रिपोर्ट) (IEA Report). असे असताना देखील अनेक कुटुंबं आजही आरामदायीपणासाठी एअर कंडिशनर्स व पंख्‍यांवर अवलंबून आहेत.

खरेतर, सॅमसंगच्‍या ग्राहक अनुभव संशोधनामधून निदर्शनास येते की भारतातील बहुतांश घरांमध्‍ये किमान तीन पंखे आहेत, ज्‍यामधून दैनंदिन जीवनातील या डिवाईसेसची महत्त्वपूर्ण भूमिका दिसून येते. भारतातील ५० टक्‍के ग्राहक एकाच वेळी डिवायसेसचा वापर करतात, रात्रीच्‍या वेळी वारंवार सेटिंग्‍जचे समायोजन करतात, जास्‍त थंड झाल्‍यास एसी बंद करतात किंवा रूममध्‍ये गरम होऊ लागल्‍यास पुन्‍हा एसी चालू करतात.

या सतत समायोजनामुळे झोपमोड होण्‍यासोबत वीजेचा वापर देखील अधिक होतो आणि अस्‍वस्‍थता वाटते. हे आव्‍हान ओळखत सॅमसंगने एअर कंडिशनर्सच्‍या २०२५ बीस्‍पोक एआय श्रेणीमध्‍ये स्‍मार्ट-थिंग्‍ज पॉवर्ड सोल्‍यूशन ‘कस्‍टमाइज्‍ड कूलिंग’ सादर केले आहे, जे रात्रभर आणि दिवसा देखील ऑटोमॅटिकली सतत आरामदायी तापमान राखते, ज्‍यामुळे मॅन्‍युअल समायोजनाची गरज भासत नाही.

हे विनासायास एकीकरण सॅमसंग स्‍मार्ट एसींना स्‍मार्टथिंग्‍ज-प्रमाणित पंखे व स्विचेससोबत सिन्‍क्रोनाइज करते, ज्‍यामधून अधिक आरामदायीपणासह वीजेचे बिल कमी येण्‍याची खात्री मिळते.

”सॅमसंगमध्‍ये आमचा विश्‍वास आहे की, आरामदायीपणा कूलिंगपेक्षा अधिक असून सर्वोत्तम, वैयक्तिकृत अनुभव आहे, जो वापरकर्त्‍यांच्‍या गरजांची पूर्तता करतो. भारतातील ग्राहक विशेषत: रात्रीच्‍या वेळी आरामदायीपणासाठी एसी व पंख्‍यांचा वापर करतात. कस्‍टमाइज्‍ड कूलिंगसह आम्‍ही एसींच्‍या २०२५ बीस्‍पोक एआय श्रेणीसह स्‍मार्टथिंग्‍ज-प्रमाणित पंखे व स्विचेसना विनासायासपणे ऑपरेट करत वारंवार समायोजन करण्‍याचा त्रास दूर करत आहोत. यामुळे मन:शांती, ऊर्जा कार्यक्षमता आणि विनाव्‍यत्‍यय आरामाची खात्री मिळते,” असे सॅमसंग इंडियाच्‍या डिजिटल अप्‍लायन्‍सेसचे उपाध्‍यक्ष गुफरान आलम म्‍हणाले.
ते पुढे म्‍हणाले, हे वैशिष्‍ट्य पुरेशी झोप मिळण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले असून तितकेच दिवसभर आरामदायीपणासाठी उपयुक्‍त आहे, जेथे आरामदायीपणा किंवा ऊर्जा बचतीसंदर्भात कोणतीच तडजोड करण्‍यात आलेली नाही.

स्‍मार्ट, ऊर्जा-कार्यक्षम आणि शाश्‍वत

‘कस्‍टमाइज्‍ड कूलिंग’ वैशिष्ट्य मॅन्‍युअल समायोजनाची गरज दूर करते, ज्‍यामधून रात्रभर पुरेशी व आरामदायी झोपेची खात्री मिळते. हे वैशिष्‍ट्य ऑटोमॅटिकली आसपासच्‍या वातावरणाशी जुळून जाते, पंखा व एसी सेटिंग्‍जना सिंकमध्‍ये समायोजित करते, ज्‍यामुळे रात्रीच्‍या वेळी किंवा दिवसा रूममध्‍ये आरामदायी वातावरण राखले जाते, तसेच वीजेचा वापर कमी होतो.
स्‍मार्टथिंग्‍ज एनर्जी सर्विसमध्‍ये उपलब्‍ध असलेले ‘कस्‍टमाइज्‍ड कूलिंग’ वैशिष्‍ट्य आरामदायीपणा आणि शाश्‍वततेची खात्री देते. हे वैशिष्‍ट्य डब्‍ल्‍यूडब्‍ल्‍यएसटी-प्रमाणित स्‍मार्ट फॅन्‍स आणि स्‍मार्ट स्विचेसशी सुसंगत आहे, ज्‍यामुळे वापरकर्ते त्‍यांच्‍या स्‍मार्ट होम्‍समध्‍ये प्रभावीपणे त्‍याचा समावेश करू शकतात.

या एकीकृत स्‍मार्टथिंग्‍ज अनुभवासह सॅमसंग ग्राहकांच्‍या घरामध्‍ये कूलिंगचा अनुभव घेण्‍याच्‍या पद्धतींमध्‍ये बदल घडवून आणत आहे. रात्रीच्‍या वेळी आरामदायी झोप घ्‍यायची असो किंवा दिवसा प्रभावीपणे स्‍मार्ट आरामदायीपणाचा अनुभव घ्‍यायचा असो एसी व फॅन सेटिंग्‍जमधील रस्‍सीखेच आता संपली आहे, कारण तंत्रज्ञान तुमच्‍यासाठी कामी ठरते, तेव्‍हा आरामदायीपणा सहजपणे मिळतो.

स्‍मार्टथिंग्‍ज बाबत

स्‍मार्टथिंग्‍ज स्‍मार्ट होम सोल्‍यूशन्‍सची आघाडीची प्रदाता आहे, जी तुमचे जीवन अधिक सुलभ, अधिक आरामदायी आणि अधिक शाश्‍वत करण्‍याप्रती समर्पित आहे. आमची नाविन्‍यपूर्ण उत्‍पादने आणि सेवा तुम्‍हाला घरातील वातावरणावर नियंत्रण ठेवण्‍यास, ऊर्जा वापर सानुकूल करण्‍यास आणि स्‍मार्टर, अधिक कनेक्‍टेड लिव्हिंग स्‍पेस निर्माण करण्‍यास सक्षम करतात.
आम्‍ही तुमच्‍याकडून आमच्‍या उत्‍साहवर्धक नवीन वैशिष्‍ट्याबाबत अभिप्राय ऐकण्‍यास आणि अधिक माहिती शेअर करण्‍यास उत्‍सुक आहोत!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *