World Cup 2023 भारतीय फलंदाजांनी दिलेल्या २४१ धावांच्या आव्हानासमोर ऑस्ट्रेलियाला डोईजड होण्याची शक्यता आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज अवघ्या ४७ धावांतच तंबूत परतले आहेत. टीम इंडियाच्या गोलंदाजीच्या अचूक मारा लक्षात घेता ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढेपाळण्यास सुरुवात झाली असून दुसऱ्या इनिंगच्या सुरुवातीलाच टीम इंडियाने सामन्यावर आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. भारताचा भरवशाच्या गोलंदाज मोहम्मद शामी याने पहिला विकेट घेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला खिंडार पाडली असून जसपित बुमरहा याने दोन विकेट घेतले आहेत.
भारतसह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला म्हणावी तशी सुरुवात करता आलेली नाही. टीम इंडियाचे सलामीचे दोन्ही फलंदाज रोहित शर्मा आणि शुबनम गिल बाद झाले आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यात ऑस्टेलियाने आपली पकड मजबूत केली आहेअत्यंत महत्वाच्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला चौथा धक्का बसला आहे. फार्मात असलेला विराट कोहली अर्धशतक पूर्ण होताच बाद झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार क्युमिन्सने त्याला त्रिफळाचित केले. विराट कोहली बाद होताच मैदानात एकच शांतता पसरली. दरम्यान, विराट कोहलीने आपल्या अर्धशतकीय खेळीत एकूण ५४ धावा केल्या. ६३ चेंडूत त्याने या ५४ धाव्या केल्या. कोहली बाद झाल्यानंतर आता टीम इंडियाने आपल्या रणनितीत बदल केला असून डावखुऱ्या रविंद्र जडेजा याला मैदानात फलंदाजीसाठी उतरविले आहे. आक्रमक फलंदाज सुर्यकुमार यादव ऐवजी रविंद्र जडेजाला फलंदाजीसाठी पाठविण्यात आल्याने सर्वघ्ंना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हेड आणि लाबुशेनला ऑस्ट्रेलियाला सावरलं
वर्ल्ड कप अंतिम सामन्यात २४१ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सामानाच्या सुरुवातीलाच तीन विकेट गमविल्याने टीम इंडियाने या सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती. त्यामुळे टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा सुरु असतानाच ऑस्ट्रेलियाचे फलंदाज त्रेविस हेड आणि मारनस लाबुशेन याने ऑस्ट्रेलियाला सावरलं. या दोघांनी मिळून आतापर्यंत चौथ्या विकेटसाठी एकूण ६८ धावांची खेळी केली आहे. भारतीय गोलदांजांना या दोन्ही फलदांजापैकी कोणालाही यश आलेले नसून फिरकी गोलंदाज या सामन्यात अद्याप चमक दाखवू शकलेले नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने सामन्यावर पडक मिळवली आहे. तर दुसरीकडे हेडने आपली अर्धशतकी खेळी पूर्ण केली आहे.
२४१ धावांचे लक्ष्य
ऑस्ट्रेलियासमवेत असणाऱ्या अंतिम सामन्यात एकाही भारतीय फलंदाजने कमाल दाखविता आलेली नाही. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजने रणनिती आखत भारतीय फलंदाजांना डोकं वर काढू दिले नाही. संपूर्ण स्पर्धेत एकही सामन्यात टीम इंडियाने गमाविला नव्हता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या गोलदांजाने अभ्यासपूर्ण गोलदांजी करीत एकाही फलंदाजाला धावा करु दिल्या नाहीत. त्यामुळे अंतिम सामन्यात भारतीय संघाला २५० पर्यंतही मजल मारता आलेली नाही. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २३१ धावांचे आव्हान असून भारतीय गोलंदाज या सामन्यात कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
टीम इंडियाची मदार आता सुर्यावर
वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा फलंदाजांनी निराशा केल्यानंतर आता मुंबईकर सुर्यकुमार यादववर टीम इंडियाची भिस्त येऊन पोहचली आहे. या संपूर्ण स्पर्धेत सुर्यकुमार यादव आपली छाप सोडू शकलेला नाही. त्यामुळे त्याच्याकडे ही सुवर्णसंधी असून तो ही जबाबदारी कितपत पार पडतोय, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. सुर्यकुमार यादव हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे सुर्या या सामन्यात कशाप्रकारे फलंदाजी करतो याकडे देशातील सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, मोहम्मद शमी देखील झेलबाद झाला असून टीम इंडियाची अवस्था २११ धावांवर ७ बाद अशी झाली आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर सन्नाटा
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सध्या एकच शांतता पसरली आहे. टीम इंडियाचा भरवशाचा के.एल.राहुल आपली अर्धशतकी पारी पूर्ण केल्यानंतर बाद झाला असून स्टेडिअममध्ये एकच शांतता पसरली आहे. के.एल.राहुल ६६ धावांची खेळी करुन झेलबाद झाला आहे. त्यामुळे आता जोरदार धक्का बसला असून स्कोअर बोर्डवर टीम इंडिया किती धावा करते? याकडे उभ्या भारताचे लक्ष लागून राहिले आहे.
वर्ल्ड कप स्पर्धच्या अंतिम सामन्याला काही वेळापूर्वी अहमदाबाद येथे सुरुवात झाली आहे. लाखो प्रेक्षकांच्या उपस्थितीत सुरु झालेल्या या सामन्याला भारतीय वायु दलाने प्रात्यक्षिकं दाखवून सगळ्यांची मने जिंकली. ऑस्टेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय सलामीच्या फलंदाज रोहित शर्मा आणि शुबनाम गिल यांनी नेहमीप्रमाणे संघासाठी चांगली सुरूवात करुन दिली. पण मिशेल स्टार्क याने शुभनाम गिल याल बाद करीत पहिले यश मिळवून दिले. त्यानंतरही भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने संघासाठी काही चौकार आणि षटकार ठोकत पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजी केली. त्यातच अर्धशतकाच्या जवळ आला असताना मॅक्सवेलला षटकार मारण्याच्या नादात रोहित झेलबाद झाला.
त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या श्रेयस अय्यर हा आजच्या सामन्यात आपली छाप सोडू शकलेला नाही. फक्त ४ धावा करीत तो ही ही झेलबाद झाला. परिणामी महत्वाच्या सामन्यात अवघ्या ८१ धावांवर भारतीय संघाला तीन विकेट गमवावे लागले आहे. सध्या मैदानात विराट कोहली आणि के. एल.राहुल खेळत असून या दोघांनी भारतीय संघाचा डाव सावरला आहे. १८ षटकात भारतीय संघाला तीन बाद १०७ धावापर्यंत मजल मारता आली आहे.
राजकीय पक्षातील दिग्गजांची हजेरी
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या अंतिम सामना पाहण्यासाठी विविध राजकीय पक्षांतील दिग्गज नेत्यांनी यावेळी हजेरी लावली आहे. केंद्रीय गृहमंत्री अंमित शहा यांच्यासोबतच बीसीसीआयचे जय शहा, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार, राजीव शुक्ला, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर याठिकाणी उपस्थित आहेत.
सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजी ढेपाळल्यानंतर त्याचे पडसाद सोशल मीडियावर दिसून आले. टीम इंडियाच्या फलंदाजांवर अनेक मिम्स व्हायरल होताना दिसले.
Live Update
Worldcup 2023 च्या अंतिम सामन्याला सुुरुवात झाली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर ही मॅच रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया vs भारत असा हा सामना सुरु झाला असून ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत फिल्डींगचा निर्णय घेतला आहे.
भारताला पहिला धक्का 30 रन्सवर शुभमन गिल कॅच आऊट….
भारताची दुसरी विकेट, रोहित शर्माची ३१ बॉल्समध्ये ४७ धावांची खेळी, मॅक्सवेलने घेतली विकेट
भारताला आता संयमी खेळीची गरज, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर मैदानात, चौकार मारून श्रेयसने केली सुरूवात

अवघ्या ८१ धावांवर भारतीय संघाला तीन विकेट गमवावे लागले आहे.
विराटचे अर्धशतक पूर्ण
भारताला सर्वात मोठा धक्का, विराट कोहली झाला बोल्ड, भारताने ४ थी विकेट गमावली
भारताची ५ वी विकेट, सर जडेजा तंबूत माघारी, केवळ ९ धावा करून परत #IndVsAus
भारताचे धुरंधर झाले गारद, सूर्यकुमार ठरेल का आशेचा किरण?
४०.५ ओव्हरमध्ये भारताने केला २०० धावांचा टप्पा पार, सूर्यकुमार आणि के. एल. राहुल मैदानावर #IndVsAus
६६ धावा करत के. एल. राहुल तंबूत माघारी, प्रेक्षकांचा श्वास रोखला, भारताने गमावली ६ वी विकेट
मोहम्मद शमी देखील झेलबाद झाला असून टीम इंडियाची अवस्था २११ धावांवर ७ बाद अशी झाली आहे