WorldCup 2023 भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या चुरशीचा सामना अनुभवण्यासाठी त्याचा आनंद लुटण्यासाठी शिवाजीपार्क येथे मोठ्या स्क्रीनवर क्रिकेटचा सामना लावण्यात आला आहे. हा सामना पाहताना क्रिकेट प्रेमीमध्ये जोश दिसून येत होता.नागरिकांना क्रिकेटचा वर्ल्ड कप सामाना एकत्र पाहता यावा यासाठी अमित ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवाजीपार्क येथे भव्य स्क्रीन लावण्यात आली होती.
सर्व भारतीयांनी एकत्र येऊन अभिमानाने हा सामना पाहवा तसेच भारतीय संघाला प्रोत्साहित करण्यासाठी मोठी स्क्रीन लावण्यात आल्याचे मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.एरव्ही दादर मधील गजबजलेले रस्ते वर्ल्ड कप मॅच असल्याने औस पडल्याचे चित्र पाहावयास मिळत होते तर वाहतूकही कमी असल्याचे दिसून आले.WorldCup 2023

प्रभादेवीत कै राजा भाऊ साळवी मनोरंजन उद्याना शेजारील परिसरात देखील मोठी स्क्रीन लावली होती प्रभादेवीतील रस्ते सुने पडले होते.प्रत्येक ठिकाणी ग्रुप ग्रुपने घरा घरात मॅच पाहताना त्याचा आनंद घेत भारतासाठी प्रोत्साहन देत घोषणा बाजी करण्यात येत होती.तर काही जणांनी भारतीय संघा सारखे कपडे परिधान करून हातात बॅट आणि बॉल घेऊन भारतीय संघाला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या.WorldCup 2023