UPI पेमेंट आता परदेशातही चालणारUPI पेमेंट आता परदेशातही चालणार

खिशात कोणतीही कॅश न ठेवता फक्त एक बारकोड स्कॅन करुन पेमेंट करण्याच्या सवयीमुळे हल्ली भारतात अनेक ठिकाणी कॅशलेस पेमेंट सुरु झाले. आता अगदी वयोवृद्धही याचा उपयोग सर्रास करतात. परंतु भारताबाहेर गेल्यानंतर अनेकदा ऑनलाईन पेमेंट करताना अनेक अडचणी येतात. त्यावेळी असे वाटते इथे या क्षणी UPI असते तर किती बरे झाले असते. आपले भारतीय रुपयातील किती पैसे गेले हे आपल्याला पटकन कळले असते. सतत परदेशवारी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्हाला काही देशांमध्ये UPI पेमेंट करणे शक्य होणार आहे. चला जाणून घेऊयात यामध्ये नेमक्या कोणत्या देशांचा समावेश आहे ते.

असा होणार भारतीयांना फायदा

UPI ही भारतातील पेमेंट सिस्टीम आहे. जी आपल्या बॅंकला कनेक्ट असते. तुम्हाला जे घ्यायचे आहे तेथील स्कॅनरवरुन आपण आपले पैसै समोरच्याला अगदी एका क्लिकवर देऊ शकतो. याचा फायदा सगळ्यांनी घेतला आहे. भारतात अनेक ठिकाणी अगदी गावाकडेही याचा वापर केला जातो. परंतु परदेशात गेल्यानंतर कार्ड स्वाईप करणे किंवा करन्सी बदलणे या शिवाय कोणताही पर्याय उरत नाही. अशावेळी आपल्याला टॅक्सदेखील भरावा लागतो. पण आता काही देशांनी असे पेमेंट स्विकारणे कबूल केले आहे. त्यामुळे पेमेंट करणे फारच सोपे जाणार आहे.

या देशांमध्ये सध्या भूतान, मलेशिया, युएई, सिंगापूर, ओमान, कतार, रशिया,फ्रान्स, श्रीलंका आणि मॉऱिशस या देशांचा समावेश आहे. येत्या काही काळात अन्य काही देशांमध्येही ही सुविधा सुरु होईल अशी अपेक्षा आहे. यात काही प्रगत देशांची नावे आहेत. त्यामुळे भारतीयांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.

Credit Card वापरताना या गोष्टी ठेवा लक्षात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *