भारतासारख्या देशात हल्ली वैमनस्यातून खून करण्याच्या घटना चांगल्याच वाढीस लागल्या आहेत. आताच्या आता या काळात इतके खून बंदुकीने करण्यात आले आहेत की, त्यामुळे बंदूक मिळवणे हे आता केवळ स्वरक्षणासाठी नाही तर दुसऱ्याला धडा शिकवण्यासाठी वाटू लागले आहे. बंदूक सारखे हत्यार जर इतक्या सहज उपलब्ध असतील तर असे गैरप्रकार नक्कीच वाढीस लागतील यात शंका नाही. नुकतीच युवाकार्यकर्ते अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे फेसबुक लाईव्हमध्ये हा सगळा प्रकार घडला. त्यानंतर स्वत:ला गोळी मारुन त्याने आपले आयुष्यही संपवले. पण यात दोन घर उद्धवस्त झाली याचा विचार झाला नाही. यावर राजकारण चांगलेच सुरु झाले. परंतु कोणीही बंदूक इतक्या सहज का दिल्या जात आहेत याचा विचार का केला नाही? यावर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. राजकारण्यांनी राजकारण बाजूला सारुन या गोष्टीवर आधी विचार करावा अशी प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.
पुण्यात काहीच दिवसांपूर्वी संदीप मोहोळ याची हत्या त्याच्याच साथीदारांपैकी एकाने केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पुण्यात एका इंजिनीअर मुलीची हत्या ही तिच्याच बॉयफ्रेंडने केवळ संशयातून केली. त्यानंतर आमदार गणपत गायकवाड यांनी देखील महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. तो व्हिडिओ देखील सगळीकडे वायरल झाला. त्यानंतर आता मॉरिस भाईने अभिषेक घोसाळकरवर गोळी झाडून स्वत:वरही गोळी झाडून घेतली. मुळात बंदूकीचा वापर जर काहीतरी राग काढण्यासाठी केला जात असेल तर अशांना बंदूक देणे कितपत योग्य हेच आता लोकांना कळेनासे झाले आहे.
याचसोबत सर्वसामान्यांमध्ये आता या बंदुकीची भीती निर्माण झाली आहे. उद्या एखाद्याला एखादी गोष्ट कोणत्याही बड्या माणसाची पटली नाही आणि त्याकडे बंदूक असेल तर त्या धाकावर तो त्याचा जीव देखील घेऊ शकतो हे इतके सोपे आता सगळे झाले आहे. याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. ज्यांच्याकडे या बंदूकी आहेत ते खरंच या साठी पात्र आहेत का? हे आता बघणे फारच जास्त गरजेचे आहे.