Abhishek Ghosalkar वर भर लाईव्हमध्ये गोळ्या झाडल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली ( 8 फेब्रुबारी 2024) त्यामुळे सगळ्यांनाच चांगला धक्का बसला. यात गोळी मारणारा मॉरिस आणि ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा अभिषेक घोसाळकर या दोघांचा मृत्यू झाला आहे. अगदी थंड डोक्याने आणि कट रचून त्याने हे सगळे केले हे त्याच्या लाईव्हमधून दिसून आले. या दोघांमध्ये काही वाद होते. ते वाद मिटून दोघांनी एकत्र आल्याची घोषणा फेसबुक लाईव्हवर केली आणि अचानक गोळीबार झाला. ज्यात अभिषेक घोसाळकर यांना चार गोळ्या लागल्या तर त्यानंतर मॉरिसने स्वत:वर गोळी झाडून स्वत:ला संपवले.
दोघांमध्ये होते वाद
मॉरिसने गेल्यावर्षी जेलची हवा खाल्ली होती. त्याचे एका गोष्टीत नाव वाईट झाले होते. एका महिलेने त्याचा विरोधात तक्रार केली होती. त्यावेळी अभिेषेक घोसाळकरने त्या महिलेची बाजू घेतली त्यामुळे मॉरिसला तुरुंगवास भोगावा लागला होता,असे त्याला वाटत होते. शिवाय यंदाच्या निवडणुकीत त्याला उभे राहण्याची इच्छा होती. परंतु आपले नाव खराब आहे हे ही त्याला माहीत होते. इतकेच नाही तर अभिषेकचे नाव हे राजकीय वर्तुळात चांगले होेते. त्याची आमदार बनवण्याची शक्यता अधिक होती हे तो जाणून होता. त्यामुळे मॉरिसने अभिषेकशी महिन्याभरापूर्वीच हात मिळवणी केली. त्याला कोणत्याही पक्षातून उभे राहणे चालणार होते. परंतु त्याला अभिषेकचा आतून रागही होताच. त्याने योग्य संधी साधून त्याच्या सोबत लाईव्ह जाण्याचे ठरवले. लाईव्ह सुरु असताना अनेकदा तो आत बाहेर करतानाही दिसला. लाईव्ह संपताच त्याने बंदुकीतून गोळ्या झाडायला सुरुवात केली. पहिली गोळी छातीला लागली दुसरी गोळी पाठीला, तिसरी आणि चौथी गोळी लागली परंतु पाचवी गोळी लागली चुकली. बंदुकीतील गोळ्या संपल्या हे लक्षात येताच लोड करण्यासाठी तो पोटमाळ्यावर गेला आणि तेथे त्याने स्वत: वर गोळी झाडून घेतली.
गोळी लागलेल्या अवस्थेत अभिषेक बाहेर आले. परंतु अंतर्गत रक्तस्त्रावामुळे त्याच्या तोंडून रक्त येऊ लागले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
तुरुंगातून आल्यानंतर अनेकदा अभिषेकला सोडणार नाही असे त्याने आपल्या पत्नीला सांगितले होते. आपले राजकीय करिअर करता करता त्याने अभिषेक आणि स्वत:ला मारुन सगळ्या गोष्टी एकाकी संपून टाकल्या.