Ashok Chavan BJP Pravesh यावरुन सध्या अनेक मतमतांतरे होताना दिसत आहेत. यामध्ये आता खासदार संजय राऊत यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी या भाजप प्रवेशाबाबत शंका उपस्थित करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. घोटाळ्याची माहिती देणारेच आता त्यांना पक्षात घेत आहेत. अशा प्रकारची टीका त्यांनी मोदी आणि भाजप यांच्यावर केली आहे. दरम्यान अशोक चव्हाण यांनी त्यांच्या आमदारकीचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला त्यामुळे अनेकांना धक्का बसला होता. त्यानंतर आता त्यांनी आपली भाजप पक्षात जाण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी याबाबत काही कारणे देखील दिली आहेत. चला जाणून घेऊया याविषयी अधिक
घोटाळे करणारेच भाजपमध्ये
खासदार संजय राऊत म्हणाले की, प्रंतप्रधान नरेंद्र मोदी या पुढे कोणाला काय तोंड दाखवणार? कारण भाजपाने मोदींच्या शिरपेचात आणखी एक खोटेपणाचा तुरा रोवला आहे. मोदी यांनी नांदेड येथे जाऊन शहीद जवान कुटुंबियांसाठी असलेल्या जागांचा कसा घोटाळा केला हे सांगितले होते. चव्हाणांनी शहीदांचा कसा अपमान केला हे देखील सांगितले होते. शहीदांच्या या अपमानाविरोधात आंदोलन देखील केले होते. त्याचे काय झाले? ते सगळं विसरुन अशोक चव्हाणांना भाजपात घेऊन तो अपमान धुवून काढला आहे.
भाजपने काँग्रेसमुक्त भारताची घोषणा अशी बदलली
भाजपने काँग्रेसमुक्त देश करण्याचे ठरवले आहे. पण काँग्रेसमधील लोकांना आपल्या पक्षात घेऊन त्यांनी एकप्रकारे काँग्रेसशी युती केली आहे. परंतु सरळ युती न करता असे करुन सगळ्या भष्ट्राचाऱ्यांना एकत्र केले आहे. असं सुरु ठेवून त्यांना त्यांची संख्या 200 पारही करता येणार नाही. कुठे नेऊन ठेवलीय भाजपा? यापुढे मोदींना देशात तोंड लपवून फिरण्याची वेळ येईल.
भाजप प्रवेशावर काय म्हणाले अशोक चव्हाण
दरम्यान अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशावर तसे शिक्कामोर्तब झाले होते. त्यांनी तसे सांगितलेदेखील की, आजपासून मी माझ्या नव्या वाटचालीला सुरुवात करत आहे. मी भाजप प्रवेश करत आहे. या आधीही मी नेटाने काम केले यापुढेही मी करेन, असे म्हणत त्यांनी टीका करणाऱ्यांना उत्तर दिले.