UAE VISA बद्दल एक महत्वाची बातमी भारतीयांना माहीत असायला हवी. एमिरेट्स दुबईमध्ये तुम्हाला जायची इच्छा असेल तर आता तुम्हाला पाच वर्षात कधीही जाता येईल असा व्हिसा दुबईतून देण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून दुबईत जाणाऱ्या भारतीयांची संख्या ही सर्वाधिक आहे. दुबईत असाल तर तुम्हाला आजुबाजूला अनेक भारतीय टुरिस्ट नक्कीच फिरताना दिसतील. त्यामुळे दुबईत हल्ली हिंदी भाषिक बोलणारेही अनेक आहेत. भारताकडून होणारा फायदा लक्षात घेत दुबईने पर्यटकांच्या सोयीसाठी मल्टी एंट्रीज व्हिसाची घोषणा केली आहे. या योजनेतून दुबईत येऊन व्यवसाय करु इच्छिणाऱ्यांना अधिक फायदा होणार आहे. जाणून घेऊया या विषयी अधिक
Credit Card वापरताना या गोष्टी ठेवा लक्षात
तर होईल अधिक फायदा
भारतातून दुबईला जाणाऱ्या लोकांची संख्या ही अधिक आहे. दुबईत भारतीयांना चांगली वागणूक दिली जाते. शिवाय टुरिझमचा विचार कराल तर भारतातून येणाऱ्या पर्यटकांमुळे दुबईलाही अधिक फायदा झाला आहे. 2023 या वर्षात दुबईत भारतातून आलेल्या पर्यटकांची संख्या ही डोळे उंचावणारी आहे. यामुळे दुबईला फायदा होणार आहे. शिवाय या देशात आपला व्यवसाय करु पाहणाऱ्यांनाही अधिकचा पैसा कमावण्यासाठी फायदा होणार आहे. सतत व्हिसा घेण्याची गरज भासणार नाही.मल्टीपर्पज व्हिसामुळे पाचवर्षात कधीही जाणे शक्य होणार आहे. शिवाय एकावेळी त्यांना साधारण 3 महिने राहणे शक्य असणार आहे. या काळात तुम्ही तुमचे काम देखील करु शकता.
असा करा व्हिसा
तुम्हालाही व्हिसा हवा असेल तर तुम्हाला तो ऑनलाईन पद्धतीने मिळेल. परंतु त्यासाठी काही नियमांचे पालन करणे देखील बंधनकारक असणार आहे. म्हणजेच तुम्हाला त्यासाठी खात्यात एक ठराविक रक्कम, तुमचे राहण्याचे ठिकाण, तुमच्या विमान योजना याची माहिती असणे गरजेचे असणार आहे. तुमचा दुबईला कामानिमित्त जाण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी हा व्हिसा फायद्याचा ठरणार आहे.
मग आता दुबईत जाणार असाल तर याचा नक्की विचार करा.