Businessman Gun Firing ची एक विचित्र घटना गोरेगाव येथे घडली आहे. एका व्यावसायिकाने घरातील काही कलहावरुन घराचा दरवाजा बंद करुन गोळ्या झाडायला सुरुवात केली. त्या आवाजाने आजुबाजूचा सारा परिसर जमा झाला. पोलिसांनी वेळीच येऊन काहीतरी अनर्थ होण्यापासून त्याला रोखले. परंतु या व्यावसायिकाने असा मूर्खपणा का केला हे ऐकून तुम्हाला जास्त आश्चर्य वाटेल. या संपूर्ण प्रकरणानंतर व्यावसायिकाकडे असलेल्या बंदुका पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
झालं असं गोरेगाव पूर्व गोकुलधाम परिसरात राहणारा व्यावसायिक राजीव रंजन हा प्यायलेला होता. दारु पिऊन तो घरी आला त्यावेळी त्याचे पत्नीसोबत काहीतरी वाजले होते. तो रागात होता. त्याचा राग अनावर झाला त्याने मुलाला आणि पत्नीला घराबाहेर काढले. दरवाजा बंद केला. बंद खोलीत जाऊन त्याने गोळीबार करायला सुरुवात केली. तो बेछुट असा गोळीबार करत होता. गोळ्यांचे आवाज हे संपूर्ण इमारतीत येत होते. तो आवाज ऐकून अनेक जण त्यांच्या घराबाहेर आले. पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी त्याला दरवाजा उघडण्याची विनंती केली. परंतु तो ऐकायला अजिबात तयार नव्हता. पण त्याने अखेर दरवाजा उघडला तोच पोलिसांना घरात काचा फुटलेल्या दिसल्या.
Abhishek Ghosalkar | … या कारणामुळे मॉरिसने झाडल्या गोळ्या
पोलिसांना राजीव यांच्याकडे दोन गन्स असल्याचे कळले. एक बंदुक ही परवाना असलेली होती. जी त्याच्या पत्नीच्या नावाने होती. तर दुसरी बंदुक ही विनापरवाना होती.यात कोणीही जखमी झाले नसले तरी अशी गोष्ट ही निष्काळजीपणे हाताळल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे. त्याची त्याला नक्कीच शिक्षा होणार आहे.