तुम्हीही बाईक चालक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फारच महत्वाची आहे. कारण अनेकदा बाईक चालवताना वाहतुकीचे कितीही नियम सांगितले तरी देखील काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्यामुळे होते असे की, आपल्याला चांगलाच मोठा दंड बसतो. वाहतुक नियमांमध्ये दुचाकी स्वारांवर अधिक नियम लावावे लागतात. कारण गती आणि कधीतरी ॲक्शन ट्राय करण्यासाठी अनेक जण असे काही वागतात त्याचा परिणाम ॲक्सिडंटमध्ये होतो. या व्यतिरिक्तही काही नियम हे वाहतुक विभागाने सांगितलेले आहे. या नियमांचे उल्लंघन केले तर तुमच्याकडून दंड घेण्याचा अधिकार हा पोलिसांना आहे हे विसरु नका. चला जाणून घेऊया हे काही नियम
तुम्ही तर नाही ना करत या नियमांची पायमल्ली
दुचाकी धारकांसाठी ही नियमांची यादी दिलेली आहे. त्यात सगळ्यात आधी जर तुम्हाला बाईक मॉडीफाय करण्याची सवय असेल किंवा आवड असेल तर त्याला आताच आवर घाला. कारण जर तुम्ही बाईकचे रुप पालटून त्याला त्याला भलतेच काहीतरी करत असाल तर अशावेळी तुम्हाला 25 हजारांपर्यंतचा दंड बसू शकतो. इतकेच नाही तर काही जण सायलेंसर आणि फॅन्सी अशा नेमप्लेट देखील लावतात. त्यामुळे तुमची गाडी तुम्हाला सुंदर वाटत असेल पण त्यामुळे तुम्हाला दंड भरावा लागू शकतो हे अजिबात विसरु नका. तुमची बाईक जर पोलिसांनी थांबवली आणि हे बदल टिपले तर त्यांना पूर्णपणे अधिकार आहे हा दंड लावण्याचा हे अजिबात विसरु नका.
आजच तुमच्या बाईकची अधिकची सजावट, काका, मामा ची प्लेट आताच काढून टाका.