Ayodhya Tourism हे आता सगळीकडेच खूप मोठ्या प्रमाणात सर्च होत आहे. राम मंदिराचा अयोध्येमध्ये दिमाखदार सोहळा पार पडल्यानंतर आता जगभरातून अनेकांना रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी जायचे आहे. येत्या काही दिवसांचे बुकिंग देखील फुल्ल झाले आहे. तब्बल 500 वर्षानंतर रामलल्लाचे हक्काचे घर असलेल्या अयोध्येमध्ये त्याला स्थान मिळाले आहे. येथे उभारण्यात आलेल्या मंदिराचा थाट पाहता आता या ठिकाणी एकदातरी जाऊन रामाचे दर्शन घेण्याची इच्छा असेल तर असे करा अयोध्या जाण्याचे प्लॅनिंग
Ramayan| सीताहरण हे निश्चितच होते…परंतु प्रभू रामांबद्दल हा आहे गैरसमज
अयोध्येला जायचंय
देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून तुम्हाला अयोध्येला जायचं असेल तर त्यासाठी नवं विमानतळ सुरु करण्यात आलेले आहे. त्यामुळे तुम्हाला व्हाया व्हाया असे काहीही करण्याची गरज नाही. मुंबई, दिल्ली अशा मोठ्या मेट्रो सिटीला अयोध्येतून फ्लाईट सुरु करण्यात आलेले आहेत. महर्षी वाल्मिकी यांचे नाव या एअरपोर्टला देण्यात आलेले आहे. साधारण 4 हजारांपासून पुढेच तुम्हाला याचे तिकीट मिळेल. जर तुम्हाला बुकिंग करता येत असेल तर तुम्ही तुमच्या तारखेनुसार सर्च करुन जिथे बेस्ट प्राईज मिळेल अशीच तारीख निवडा. म्हणजे तुमच्या खिशाला ताण पडणार नाही. या शिवाय ज्यांना रेल्वेने प्रवास करायचा आहे. अशांसाठीही अयोध्या स्टेशन आहेच. तेथूनही तुम्हाला हा प्रवास करता येईल.
प्रवासाचा एकाचा खर्च हा साधारण 10 हजारांच्या आसपास होईल.
प्रवास सोप्पा आणि सुलभ
अयोध्या विमानतळापासून अयोध्या राम मंदिर हे केवळ 30 मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे तुम्हाला प्रवासात खूप वेळ घालवायला हवा असेही नाही. तुम्ही वेळ पाहून अयोध्येला पोहोचा आणि सगळ्यात आधी रामाचे दर्शन घेऊन मगच मंदिर परीसरात फेरफटका मारा. कारण या मंदिराचे अजूनही काम सुरु आहे. काही गोष्टी अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे थोडे महिन्यांनी याचे प्लॅनिंग केले तर फार उत्तम ठरेल.
अयोध्येला धावती भेट द्यायची असेल तर सकाळी येथे पोहोचा. एक संपूर्ण दिवस येथे घालवा आणि राम लल्लाला पाहून तो आनंद घेऊन परता.