आपल्यासाठी स्वार्थी होणे चुकीचे नाहीआपल्यासाठी स्वार्थी होणे चुकीचे नाही

Life Mantra आजच्या या कलियुगात आपली साथ कोण कधी सोडेल? कोण आपल्याला दगा येईल या विषयी कोणावरचं विश्वास ठेवणे कठीण आहे. पण आयुष्य हे असेच आहे, जो पर्यंत आहे तो पर्यंत आपल्यासाठी जगता आले पाहिजे. माणूस म्हटलं की, त्यावर विविध जबाबदाऱ्या या आल्याच. पण त्यात तुम्ही कधी हरवून जाता हे समजत नाही. त्याच तुमचं असं अस्तित्व कधीच राहात नाही. हे कळतं तो पर्यंत खूप उशीर झालेला असतो. म्हणून आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत. तो तुम्हाला स्वार्थी होण्याचा सल्ला देणारा आहे. स्वार्थी या शब्दाचा कायम अर्थ हा वाईट असतो असे नाही. तो तुम्ही स्वत:साठी ज्यावेळी वापरता त्यावेळी त्याचा फायदा हा केवळ तुमच्यासाठी असा असतो. जीवन जगताना स्वार्थी व्हायचे म्हणजे काय? याविषयी आपण आज अधिक जाणून घेणार आहोत.

Mother In Law | असं जिंका तुमच्या सासूचं मन…. वाचा या 5 टिप्स

स्वार्थीपणा ही महत्वाचा Life Mantra

केवळ आपल्यासाठी वस्तू जमा करण्याचा किंवा दुसऱ्याकडून ओरबाडून आपल्याकडे काही गोष्टी घेण्याच्या स्वार्थीपणाबद्दल आम्ही बोलत नाही. तर या ठिकाणी हा स्वार्थीपणा तुमच्यासाठी कसा फायद्याचा असेल याबद्दल बोलत आहोत. अनेकदा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना आपल्याला एखादी गोष्ट करायची असते पण ती यामुळे कुठेतरी राहून जाते. जबाबदाऱ्या झटकणं शक्य नसतं हे जरी खरं असलं तरी काही जबाबदाऱ्या या तुम्ही स्वत:हून तुमच्या अंगावर अशा काही घेतलेल्या असतात की, त्यांना झटकायचे असूनही तुम्हाला झटकण्याचा विचार येत नाही. जबाबदारी अशी असावी ज्यातून तुम्हालाही कधीतरी फायदा होईल. परंतु गाढवाप्रमाणे एखाद्याचे ओझे तुम्ही उचलत असाल तर आजच ते झटका आणि केवळ आपला विचार करा.

तुम्हाला जे आवडतं ते करा

दुसऱ्यांना काय आवडतं याचा जितका विचार तुम्ही करता ना तितकंच तुम्हाला काय आवडतं याचा विचार करा. आठवा शेवटी तुम्ही तुमच्या आवडीची गोष्ट कधी केली होती. पुरुष असो वा स्त्री कधीकधी आपल्या सगळ्या गोष्टी मागे ठेवून दुसऱ्याला काय आवडतं याचा विचार करते. पण जे तुम्हाला आवडेल तेही कधीकधी आपल्या आयुष्यासाठी करायला हवे. काळाच्या या ओघात तुमच्या काही हौशी राहून गेल्या असतील तर त्या पूर्ण कधी करणार? त्या पूर्ण करायलाच हव्यात ना? त्या पूर्ण करणे म्हणजे स्वत:साठी स्वार्थी होणे यात काहीही वाईट नाही.

मनासारखे जगताना

मनासारखे जगणे का वाईट असावे? आपल्याला मिळालेला मनुष्य जन्म हा केवळ दुसऱ्यांचा विचार करण्यासाठी आपण का घालवायला हवा. तो आपल्यालासाठीच घालवणे गरजेचे असते. दिवसाच्या 24 तासात एखादा तास तुम्हाला तुमच्यासाठी काढता यायला हवा. तसे झाले नाही तर तुमचे आयुष्य हे निरर्थक आहे. मनासारखे जगा म्हणा चुकीच्या सवयी बाळगा असे नाही. ज्या गोष्टी करुन तुम्हाला समाधान मिळते ते करा. निवांत झोप ही देखील आजच्या काळात महत्वाची असते. कोणाच्या दबावाखाली आणि घाबरुन जगण्यात काहीही अर्थ नाही. असे जगणे काहीही कामाचे नाही.

म्हणून एकदा तरी विचार करा मनुष्य जन्म खूप मोठ्या पुण्याईने मिळालेला आहे त्याचा वापर आपल्यासाठी करा. इतरांसाठीच प्रत्येकवेळी काही करायला हवे असे काही नसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *