LGBTQ जगात जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला आपल्याप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे. तुम्हाला जसं आवडतं तसं राहण्याचा अधिकार आहे. लिंगभेद हा यात आता राहिलाच नाही. आता गे, लेस्बियन, क्विर या सगळ्यांनाच आपण आपल्यात सामावून घेतलेले आहे. त्यांच्यात आणि आपल्यात कोणताही बदल नाही. मुलगा असून ज्याला मुलीसारखे राहावेसे वाटते यात त्याची निवड आहे हे आपण सगळ्यांनीच आता मान्य केलेले आहे. त्यामुळे आता समाजात अशा लोकांना अजिबात वेगळी वागणूक दिली जात नाही. परंतु आता सोशल मीडियावर काही अशा पोस्ट दिसतात की ज्यामुळे ‘अशा’ लोकांना दिलेल्या स्वातंत्र्याचा फार जास्त गैरफायदा घेतला जात आहे असे नेटीझन्सना वाटू लागले आहे. आपल्या सेक्स्श्युॲलिटीवर व्लगर व्हिडिओ बनवणे सध्या इतके वाढले आहे की, जिथे तिथे आपल्याला असे घडताना दिसते.
सोशल मीडियावर जरा जपून
सोशल मीडियावर काय करायचे काय नाही हा आपला चॉईस आहे. परंतु काही व्हिडिओ जेव्हा आपण सामान्य म्हणून पोस्ट करतो अशावेळीही आपल्याला ट्रोल केले जाते. परंतु ज्यावेळी तुम्ही LGBTQ असल्याचे सांगता आणि असे काही व्हिडिओ करता ज्यामुळे तुम्हाला चांगले न समजता उगाचच काहीतरी प्रक्षोभक करता असे समजले जाते. जे अजिबात चांगले नाही. हल्ली सोशल मीडियावर आपली सेक्श्युॲलिटी दाखवून देण्यासाठी काहीतरी विचित्र व्हिडिओ बनवले जातात. उगाचच काहीतरी कपडे घालून आणि विचित्र बोलून असे व्हिडिओ केल्यामुळेच या सगळ्या गोष्टींचा वीट येऊ लागला आहे.
आपल्याकडे हल्ली इन्स्टाग्राम हे असे माध्यम झाले आहे. जिथे गे, लेस्बियन हे कसे खराब असतात असे काही कंटेट बनवले जातात. आता कुठे आपला समाज या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करु पाहतंय. त्यात जर अशा काही गोष्टी सातत्याने दिसू लागल्या तर मात्र याला परवानगी मिळणे कठीण आहे.
सोशल मीडियावर फारच विचित्र पोस्ट असतात.ज्या पाहिल्यानंतर येणाऱ्या पुढच्या पिढीला नेमकं काय समजावून सांगायचं हे कळणार नाही. म्हणूनच या कम्युनिटीशी निगडीत असणाऱ्या सगळ्यांनी आपला आदर इतरांनी कसा राखायला हवा. हे देखील मनात ठेवायला हवे. समाजात वावरताना स्वातंत्र्य जितके महत्वाचे आहे तितकी समाजाप्रतीची जबाबदारीही महत्वाची आहे. त्यामुळे तुम्ही काय पोस्ट करताय याचा देखील एकदा तरी विचार करा.