traffic noise causes heart attack

गेल्या काही वर्षांत हृदयाचा त्रास असणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे, यात शंका नाही. तरुणही मोठ्या प्रमाणात हृदयविकाराचे बळी ठरत आहेत, ही चिंतेची बाब असून, यामागे एकच कारण नाही. प्रत्येक वेळी अभ्यासात नवीन कारण समोर येताना दिसते. 

अलीकडेच, जर्नल सर्क्युलेशन रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात वाहतुकीचा आवाज अर्थात ज्याला Traffic Noise म्हटले जाते त्याचा आणि हृदयविकाराचा झटका यांच्यातील संबंध आढळून आला आहे. आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या टीमने विविध रोगांसाठी जोखीम घटक शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात माहितीचे विश्लेषण केले. त्यातील निष्कर्षांमुळे Traffic Noise आणि स्ट्रोक, मधुमेह यांसारख्या हृदयविकाराचा विकास यांच्यामध्ये अगदी जवळचा संबंध दिसून आला आहे.

आवाजाच्या तीव्रतेने हृदयविकाराचा धोका 

विश्लेषणात असे आढळून आले की रस्त्यावरील वाहतुकीच्या आवाजात प्रत्येक 10 डेसिबल वाढीमागे हृदयविकाराचा धोका 3.2 टक्क्यांनी वाढतो. अशा परिस्थितीत वाहतुकीचा आवाज कमी करण्यासाठी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.

( वाचा – Heart Attack | तरुणांमध्ये वाढतेय हार्ट अटॅकची भीती, काय आहेत कारणं)

ट्रॅफिकच्या आवाजामुळे कसा होतो हृदयावर परिणाम?

रात्रीच्या वेळी वाहतुकीच्या आवाजामुळे झोप न लागण्याचा त्रास होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत झोपेच्या कमतरतेमुळे रक्तवाहिन्यांमधील स्ट्रेस हार्मोन्सची पातळी वाढते, ज्यामुळे जळजळ आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.

(वाचा – Sayaji Shinde | सयाजी शिंदेच्या छातीत दुखायला लागलं आणि झाली अँजिओप्लास्टी, करू नका या लक्षणांकडे दुर्लक्ष)

हृदयविकारास जबाबदार 

जर्मनीतील मेन्झ येथील युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरचे वरीष्ठ प्राध्यापक आणि अभ्यासाचे प्रमुख लेखक थॉमस मुन्झेल म्हणतात की, पुराव्याच्या आधारावर आता Traffic Noise हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांसाठी जोखीम घटक म्हणून ओळखला जातो. 

(वाचा – Benefits Nabhi Oil | नाभीत तेल घालण्याचे हे आहेत आश्चर्यचकित करणारे फायदे)

काय आहेत उपाय? 

ट्रॅफिकचा आवाज कमी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला अनेक व्यावहारिक उपाय सुचवले आहेत. गजबजलेल्या रस्त्यांवर, विशेषतः निवासी भागात ध्वनी अडथळे बसवून आवाजाची पातळी 10 डेसिबलपर्यंत कमी केली जाऊ शकते. 

याव्यतिरिक्त, रस्ते बांधणीत ध्वनी-शोषक डांबर वापरल्याने आवाजाची पातळी 3-6 डेसिबलने कमी होऊ शकते. वैयक्तिक स्तरावर, संशोधकांनी शहरी रस्त्यावरील रहदारीचा आवाज कमी करण्यासाठी सायकल आणि सार्वजनिक वाहतूक यासारख्या पर्यायी वाहतुकीचा अवलंब करण्याची शिफारस केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *