सतत पोट फुगल्यासारखे वाटते का?सतत पोट फुगल्यासारखे वाटते का?

Stomach Bloting चा त्रास आपल्यापैकी खूप जणांना असतो. कधीकधी काहीही न खाता आपले पोट इतके फुगते की, आपल्याला काहीतरी झाले का अशी भीती आपल्याला वाटू लागते. पण सततचे होणारे ब्लोटींग हे अनेकांसाठी त्रासदायक ठरते. असा त्रास झाला की, खाण्याची अजिबात इच्छा होत नाही. हा त्रास नेमका कशामुळे होतो असा विचार कराल तर त्यासाठी अनेक कारणे असू शकतात. तुमच्या ब्लोटींग होण्यामागे विविध गोष्टी कारणीभूत असतात. जर तुम्हाला त्यामागचे कारण कळले तर त्यावर उपाय करणे हे तितकेच सोपे जाते. चला जाणून घेऊया या मागील काही कारणे

खूप जास्त खाणे

कधी कधी आपल्याला लक्षात येत नाही. परंतु आपण आपल्या क्षमतेपेक्षा थोडे अधिकच खातो. असे अधिक खाणे कधीकधी आपल्या ब्लोटींगचे कारण बनते. शरीराची पचनक्रिया सुरु होण्यासाठी शरीरात जागा असणे ही गरजेचे आहे. जसे मिक्सर जर काठोकाठ भरला असेल तर आपल्याला नीट वाटण करता येत नाही. कारण मिक्सरलाच अडथळा निर्माण होतो. अगदी त्याचप्रमाणे ज्यावेळी तुम्ही पोट भरुन खाता त्यावेळी तुमची पचनक्रिया होणे शक्य नसते. अशावेळी तुमचे पोट फुगल्यासारखे वाटते.

SuperFoods| प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी 5 सुपरफूड्स

गॅसेस

आपण दिवसभरात असे काही पदार्थ खातो त्यामुळे आपल्याला गॅसेस होण्याची शक्यता असते. जर तुम्ही तुम्हाला बाधणारे असे पदार्थ खाल्ले तर त्यामुळे तुमच्या पोटात आपसुकच गॅसेस तयार होतात. ते जर योग्य पद्धतीने बाहेर पडले नाही. तर त्या कालावधीसाठी तुम्हाला पोट फुगल्यासारखे वाटते. जसे की, काही कडधान्ये खाल्ल्यानंतर असा त्रास आपल्याला होतो.

बद्धकोष्ठता

आपले आरोग्य हे अनेकदा आपल्या पोटाच्या आरोग्यावर अवलंबून असते. जर तुमचे पोटाचे आरोग्य बिघडले की तुमचे सर्व आरोग्य बिघडण्याची शक्यता अधिक असते.अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो. काहींना रोजच्या रोज शौचाला होत नाही अशावेळीही पोट फुगल्यासारखे वाटते. अशावेळी तुम्हाला बद्धकोष्ठतेवर उपाय करणे गरजेचे असते.

कोल्ड्रिंक्सचे अति सेवन

खूप जण खाल्लेले जिरवण्यासाठी कोल्ड्रिंक्स पितात. काहींना जेवणासोबत सोडा असलेले पेय पिण्याची जणू सवयच झालेली असते. ते प्यायल्यानंतर जो ढेकर येतो. त्यामुळे आपण योग्य काहीतरी करतो असे अनेकांना वाटते. परंतु हीच सवय पोटात गॅस तयार करते. कधीकधी याच्या सेवनामुळेच तुमचे पोट हे फुगल्यासारखे वाटते असे तुमच्या नक्कीच लक्षात येईल.

घाईघाईत खाणे

जेवण हे तुम्ही नेहमी सावकाश एक एक घास चावून खाणे गरजेचे असते. परंतु काही जणांना जेवण इतक्या वेगाने खाण्याची सवय असते की, त्यामुळे त्यांना काय त्रास होतो हे देखील लक्षात येत नाही. जर तुम्ही खूप घाईघाईत खात असाल तर अशावेळी तुम्ही ही सवय सोडायला हवी. त्यामुळे तुमच्या ब्लोटींगचा त्रासही कमी होईल.

ब्लोटींगवर असा मिळेल आराम

सुपरफुड्स
सुपरफुड्स

जर तुम्हाला सतत ब्लोटिंगचा त्रास होत असेल तर अशावेळी तुम्ही काही सवयी सोडून चांगल्या सवयी आचरणात आणायला हव्यात

  1. जेवण हे नेहमी पोट भरण्यासाठी नाही तर शरीराला पोषण मिळण्यासाठी खा. पोट थोडे रिकामे राहील असे पाहा.
  2. प्रोबायोटिकचा आहारात समावेश करा त्यामुळे तुमचे पोटाचे आरोग्य चांगले राहते.
  3. शरीरात पाणी हे देखील योग्य प्रमाणात असायला हवे. जर तुम्ही पाणी योग्य प्रमाणात प्याल तर तुमचे पोटाचे आरोग्य चांगले राहील.
  4. आाहारत भाज्या आणि फळांचाही समावेश करा

आता जर तुम्हाला असा ब्लोटींगचा त्रास होत असेल तर या गोष्टींचा नक्की विचार करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *